नवी दिल्ली : काँग्रेसने (Congress) भारत बचाओ रॅलीमध्ये ( Bharat Bachao Rally )आर्थिक मंदी, बेरोजगारी, महिला सुरक्षा आणि शेतकऱ्यांच्या मुद्यांवरुन मोदी सरकारला जोरदार घेरले. आज भाजप देशाचे तुकडे करण्यासाठी प्रयत्न करत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान भाजपमुळे धोक्यात आले आहे. भाजप सरकारने देशाला मंदीच्या खाईत लोटले. यांच्यामुळे देशात बेरोजगारांची संख्या चार कोटींवर गेली आहे, अशी जोरदार टीका काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांनी केली.
PG Vadra, Congress: I'd like to tell every citizen of this country - raise your voice. You love this country, become its voice. If we don't raise our voice, stay back in the darkness of fear & lies even in these circumstances, & stay quiet then our Constitution will be destroyed. pic.twitter.com/KHXyiYrRHA
— ANI (@ANI) December 14, 2019
दिल्लीतील जंतरमंतर येथे काँग्रेसची मोठी रॅली काढण्यात आली. काँग्रेस अध्यक्ष म्हणून सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्या नेतृत्वाखाली निघालेली ही मोठी रॅली आहे. या रॅलीपूर्वी ज्याप्रकारे भाजपने संसदेत राहुल गांधी यांना घेरण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे आज या रॅलीद्वारे काँग्रेस नेत्यांबरोबरच राहुल गांधी यांचाही आक्रमक पवित्रा पाहायला दिसला. त्याआधी प्रियांका गांधी यांनी आक्रमक होत आरएसएस आणि भाजपवर टीकास्त्र सोडले. आज आताच्या केंद्रातील सरकारमुळे देशाची वाट लागली आहे. अनेक ठिकाणी चुकीच्या निर्णयामुळे हिंसाचार भडकला आहे. मोदी है तो मुमकीन है, एवढेच नारे भाजपकडून देण्यात येत आहेत. आपल्या देशाला वाचवण्यासाठी या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे, प्रियांका गांधी म्हणाल्यात.
#WATCH Delhi: Congress leader Priyanka Gandhi: "...Har bus stop, har akhbar pe dikhta hai 'Modi hai to mumkin hai'. Asliyat ye hai ki 'BJP hai to Rs 100 kilo ki pyaaz hai, BJP hai to 45 saal mein sabse zyada berozgari mumkin hai, BJP hai to 4 cr naukriyan nasht hona mumkin hai.." pic.twitter.com/6sr1CAYD9n
— ANI (@ANI) December 14, 2019
तरुणाना स्वप्न दाखवणारा आणि मुलींना सक्षम करणारा हा देश आहे आहे. मात्र, मोदी सरकार आल्यापासून देश मंदीत गेला आहे. बरोजगारांची संख्या वाढत आहे. हाताला काम मिळत नाही. म्हणून तरुणांनी देशाला वाचविण्याची गरज आहे. अहिंसा आणि प्रेमाच्या माध्यमातून देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे. भारताला मोठ्या स्वातंत्र्यसंग्रामाला सामोरे जावे लागले आहे असे सांगत भाजपच्या विविध योजनांवर, धोरणांवर प्रियांका गांधी यांनी जोरदार टीकास्त्र सोडले.