राजस्थान निवडणूक : कोट्यधीश आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार

राजस्थानात निवडणुकीत उभ्या राहिलेल्या उमेदवारांपैंकी तब्बल ५९७ उमेदवार कोट्यधीश आहेत 

Updated: Dec 7, 2018, 04:47 PM IST
राजस्थान निवडणूक : कोट्यधीश आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार title=

जयपूर : राजस्थान विधानसभा निवडणूकीत यंदा कोट्यधीश आणि गुन्हे असलेल्या उमेदवारांची संख्या २०१३ च्या तुलनेत जास्त आहे. असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म (एडीआर) उमेदवारांच्या शपथपत्राचा अभ्यास करून कोट्यधीश आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. काँग्रेसमध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सर्वाधिक उमेदवार असल्याचा दावा एडीआरने केलाय.

किती उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे...

- २२९४ उमेदवारांपैकी ३२० गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले उमेदवार (१५ टक्के)

- २०१३ मध्ये २२४ (११ टक्के) उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे होते

- १९५ उमेदवारावर गंभीर गुन्हे

- १६ उमेदवारांनी महिलांसंदर्भात गुन्हे

- २५ उमेदवारांवर हत्यांचा प्रयत्नाचे गुन्हे

- १८ उमेदवारावर अपहरणाचे गुन्हे

पक्षनिहाय संख्या....

- काँग्रेसमध्ये सर्वाधिक ४३ उमेदवार (२२ टक्के) गुन्हेगारी पार्श्वभूमीचे

- भाजपमध्ये ३३ उमेदवार (१७ टक्के) गुन्हेगार

- आम आदमी पार्टी २६ उमेदवार (१८ टक्के) गुन्हेगार

- बीएसपी ३१ उमेदवार (१७ टक्के) गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत.

राजस्थानमधील २०० मतदारसंघात ४८ म्हणजेच २४ टक्के जागांवर ३ पेक्षा जास्त उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत.

संपत्तीच्या बाबतीत म्हणायचं झालं तर...

- ५९७ उमेदवार कोट्यधीश

- १७९ उमेदवाराकडे ५ कोटी पेक्षा जास्त संपत्ती

- २१२ उमेदवार २ ते ५ कोटी संपत्ती

- ४४७ उमेदवार ५० लाख ते २ कोटी संपत्ती

- ६०० उमेदवार १० ते ५० लाख रूपये संपत्ती

श्रीमंत उमेदवार - पहिले तीन

१. जमींदारा पक्षाच्या कामिनी जिंदल यांची सर्वाधिक २८७ कोटी संपत्ती आहे

२. काँग्रेस पक्षाचे परसराम मोरदीया १७२ कोटी संपत्ती

३. भाजपचे प्रेम सिंग बिजौर १४२ कोटी संपत्ती (नीम का थाना मतदारसंघ)

कोणत्या पक्षाचे किती कोट्याधीश?

- भाजपच्या १९८ उमेदवारांची संपत्ती प्रत्येकी सरासरी ६.८८ कोटी आहे

- काँग्रेसच्या १९३ उमेदवाराची संपत्ती प्रत्येकी सरासरी ७.५७ कोटी आहे

- आपच्या १४१ उमेदवाराची संपत्ती प्रत्येकी सरासरी ७५.७० लाख

- बसप १७८ उमेदवाराची संपत्ती प्रत्येकी सरासरी १.३ कोटी