मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज राम मंदिर भूमिपूजन करण्यात आले आहे. त्यासाठी मोदी हे सकाळी अयोध्येत पोहोचलेत. त्यांनी हनुमानगढीवर जाऊन दर्शन घेतले आणि पूजा-आरती केली. त्यानंतर त्यांनी रामलल्लाचे दर्शन घेतले. भूमिपूजन समारंभात सहभागी झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंत्रोच्चाराच्या गजरात राम मंदिर उभारणीचा भूमिपूजन सोहळा थाटात पार पडला. यावेळी पंतप्रधानांसह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि सरसंघचालक मोहन भागवत हेदेखील उपस्थित होते. यापूर्वी पंतप्रधानांनी हनुमान गढी मंदिरात पूजा केली. त्यानंतर त्यांनी या ठिकाणी वृक्षारोपणही केले.
Prime Minister Narendra Modi takes part in Ram Temple 'Bhoomi Pujan' at Ayodhya pic.twitter.com/Qal0jH3Edy
— ANI (@ANI) August 5, 2020
अयोध्या Live अपडेट्स - ( झी २४ तासवर पाहा थेट लाईव्ह, येथे करा क्लिक )
पीएम मोदी यांनी भगवान श्रीरामलल्लाला विराजमान केले. पंतप्रधान मोदी दुपारी १२.४० वाजता रामजन्मभूमी येथे राम मंदिराचा पायाभरणी केला. अयोध्येत भगवान राम यांच्या भव्य मंदिराच्या बांधकामासाठी भूमिपूजन कार्यक्रम सुरु झाला आहे. राम मंदिर भूमिपूजन कार्यक्रमात चांदीचे फावडे आणि चांदीची कणी वापरण्यात आली आहे. अयोध्येत भगवान राम यांच्या भव्य मंदिराच्या बांधकामासाठी भूमिपूजन कार्यक्रम सुरु झाला आहे. मोदी विधी समारंभाला उपस्थित आहेत.
अयोध्या Live अपडेट्स - ( झी २४ तासवर पाहा थेट लाईव्ह, येथे करा क्लिक )
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान मोदींचे स्वागत केले. त्यानंतर पीएम मोदी यांनी हनुमानगिरी मंदिरात पूजा केली. पीएम मोदींनी भगवान श्रीरामळाला विराजमान केले. काही वेळानंतर रामजन्मभूमी येथे राम मंदिराचा पायाभरणी करतील.
मोदी हे हनुमानगढीवर पोहोचले. त्यांनी पुजाआरती केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राम मंदिर भूमिपूजनासाठी अयोध्येत दाखल झालेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांचे स्वागत केले.
Prime Minister Narendra Modi arrives in Ayodhya for foundation stone-laying of #RamTemple, received by Chief Minister Yogi Adityanath and others.
Social distancing norms followed by those present to receive the Prime Minister. pic.twitter.com/DvJbIlDLRb
— ANI (@ANI) August 5, 2020
राम मंदिराच्या बांधकामासाठी भूमिपूजन कार्यक्रमाच्या मोठा उत्साह दिसून येत आहे. राम मंदिराच्या भूमिपूज समारंभासाठी अवघी अयोध्या नगरी सजली आहे. शरयू तीर भगव्या रंगात न्हाऊन निघालाय.
Ayodhya: Rashtriya Swayamsevak Sangh (RSS) Chief Mohan Bhagwat at the Ram Janambhoomi site for 'Bhoomi Poojan'#RamMandir pic.twitter.com/2r0NUwj66J
— ANI (@ANI) August 5, 2020
वॉशिंग्टन येथे उत्साहाचे वातावरण. भारतीय नागरिकांनी भगवा झेंडा हातात घेत राम मंदिराच्या बांधकामासाठी भूमिपूजन कार्यक्रमाबाबत उत्सुक असल्याचे दिसून येत आहे. याबाबत एएनआयने छायाचित्र शेअर केलेय.
अयोध्येत प्रभू राम यांच्या भव्य मंदिराच्या बांधकामासाठी भूमिपूजन कार्यक्रमास सुरुवात झाली आहे. पंतप्रधान मोदी दुपारी १२.४० वाजता रामजन्मभूमी येथे राम मंदिराचा पायाभरणी करतील. सकाळी ११.३० वाजता पंतप्रधान मोदी अयोध्येत पोहोचतील.या सोहळ्यादरम्यान सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. तसंच या परिसरात जाण्यासाठी निमंत्रण पत्रिकांवर हाय सिक्युरिटी कोड देण्यात आला आहे.
या द्वारेच संबंधित व्यक्तीला भूमिपूजनाच्या ठिकाणि प्रवेश दिला जाणार आहे. यामध्ये १३५ संत-महंतांचा समावेश आहे. भूमीपूजनासाठी अयोध्येत सजावटीसोबतच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी बॅरिकेट्स लावले आहेत. चार पेक्षा जास्त लोकांना बंदी आहे. या निमित्ताने उत्तर प्रदेश राज्यात काही ठिकाणी प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. दीपोत्सवासाठी शरयू नदीचे घाट सुशोभित करण्यात आला आहेत. प्रभू राम यांच्या भव्य मंदिराच्या बांधकामासाठी भूमिपूजन कार्यक्रमासंदर्भात 'झी २४ तास'वर आज दिवसभर या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे.
USA: Members of the Indian community gathered outside the Capitol Hill in Washington DC to celebrate the foundation laying ceremony of #RamTemple in #Ayodhya pic.twitter.com/NofEWuM3E5
— ANI (@ANI) August 5, 2020
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अयोध्या दाखल झालेत.
- दिल्ली येथून पंतप्रधान मोदी रवाना. पीएम मोदी आधी लखनऊ पोहोचणार. पीएम नरेंद्र मोदी हनुमानगढीचे दर्शन करुन आणि राम जन्माच्या ठिकाणी जाणार.
Prime Minister Narendra Modi leaves for #Ayodhya to take part in #RamTemple event.
(Photo source: PMO) pic.twitter.com/VU9uGmzdJB
— ANI (@ANI) August 5, 2020
- योगगुरु बाबा रामदेव हे भूमिपूजनाच्या सोहळ्यासाठी अयोध्येत पोहोचले आहेत। त्यांनी आज सकाळी हनुमानगढी येथे पूजा केली. तसेच आजचा दिवस ऐतिहासिक आहे आणि आज आपण रामराज्यात प्रवेश केला आहे, असे ते म्हणाले
अयोध्या: योग गुरु रामदेव ने हनुमान गढ़ी मंदिर में पूजा की। रामदेव ने कहा," 5 तारीख देश की ऐतिहासिक तारीख है। आज के दिन को सदियां याद करेगी। भारत राम राज्य में प्रवेश कर रहा है।" pic.twitter.com/tcARltd2IN
— ANI_HindiNews (@AHindinews) August 5, 2020
- पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या निवासस्थानाहून सकाळी ९.३५ वाजता प्रस्थान करतील
Prime Minister Narendra Modi to attend the foundation stone laying ceremony of #RamMandir in Ayodhya today. (file pic) pic.twitter.com/gSouwXifIw
— ANI UP (@ANINewsUP) August 5, 2020
- राम मंदिर तीर्थक्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष नृत्य गोपाल दास आपल्या आश्रमातून सकाळी १०.३० वाजता राम जन्मभूमीसाठी होणार रवाना.
#WATCH The idol of 'Ram Lalla' at the Ram Janambhoomi site in #Ayodhya.
Prime Minister Narendra Modi will perform 'Bhoomi Poojan' for #RamTemple at the site later today. pic.twitter.com/eL29b500Mx
— ANI (@ANI) August 5, 2020
- अयोध्या शहराची सर्व प्रवेशद्वार बंद, अयोध्येत कोणत्याही वाहनाला प्रवेश करण्यात आला बंद
Ayodhya decorated ahead of the foundation stone laying ceremony of #RamMandir today; visuals from Saryu Ghat. pic.twitter.com/S3LPcXVkWF
— ANI UP (@ANINewsUP) August 5, 2020
- राम मंदिरात शिळा स्थापन करण्याचा कार्यक्रम सकाळी ८ वाजल्यापासून सुरु झाला
उत्तर प्रदेश:अयोध्या में राम मंदिर भूमिपूजन समारोह के लिए तैयारियां कर ली गई हैं।
भूमिपूजन समारोह में मंच पर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी,आरएसएस प्रमुख मोहन भागवत, राम मंदिर ट्रस्ट के प्रमुख नृत्य गोपाल दास, उ.प्र. की राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मौजूद रहेंगे pic.twitter.com/F7mlDHTU3N
— ANI_HindiNews (@AHindinews) August 5, 2020
- मंचावर पंतप्रधान मोदी यांच्यसह राज्यपाल आनंदीबेन पटेल, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राष्ट्रीय स्वयंसेवत संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि नृत्य गोपालदास उपस्थित राहणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मिनिट टू मिनिट कार्यक्रम
- ५ ऑगस्ट रोजी सकाळी दिल्लीहून निघतील
- सकाळी ९.३५ वाजता विशेष विमान दिल्लीहून उड्डाण करेल
- लखनऊ विमानतळावर सकाळी १०.३५ वाजता लँडिंग
- सकाळी १०.४० वाजेपर्यंत अयोध्याला प्रयाण
- सकाळी साडेअकरा वाजता अयोध्या साकेत कॉलेजच्या हेलिपॅडवर लँडिंग
- सकाळी ११.४० वाजता हनुमान गढी येथे पोहोचले आणि १० मिनिटे पूजा केली.
- रात्री १२ वाजता रामजन्मभूमी परिसराला पोहोचण्याचा कार्यक्रम
- १० मिनिटांत रामलला विराजमानचे दर्शन
- दुपारी १२.१५ वाजता रामलाला परिसरात पारिजात वृक्षारोपण
- भूमिपूजन कार्यक्रम दुपारी १२.३० वाजता सुरू होईल
- दुपारी १२.४० वाजता राम मंदिराच्या पायाभरणीची स्थापना
- दुपारी १.१० वाजता नृत्य गोपाल दास वेदांती यांच्यासह ट्रस्ट समितीची भेट घेण्यासाठी
- दुपारी २.०५ वाजता साकेत कॉलेज हेलिपॅडसाठी प्रयाण
- हेलिकॉप्टर दुपारी २.२० वाजता लखनऊला उड्डाण करेल
कार्यक्रमस्थळाच्या स्टेजवर पाच लोक असतील
१. नरेंद्र मोदी, पी.एम.
२.महंत नृत्य गोपाल दास, अध्यक्ष राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र
३. योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री
४. मोहन भागवत, संघ प्रमुख
५. आनंदी बेन पटेल, राज्यपाल