SBI चं करोडो ग्राहकांना दिवाळी गिफ्ट

SBI New FD Rates : दिवाळीच्या आधीच एसबीआयने आपल्या ग्राहकांना गुडन्यूद दिली आहे.

Updated: Oct 15, 2022, 06:45 PM IST
SBI चं करोडो ग्राहकांना दिवाळी गिफ्ट title=

SBI : दिवाळीच्या आधी स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) पुन्हा एकदा आपल्या करोडो ग्राहकांना आनंदाची बातमी दिलीये. त्यामुशे SBI मध्ये तुमचं खाते असेल तर तुम्हाला ही याचा फायदा होऊ शकतो. बँकेने FD व्याजदर (FD व्याजदर) पुन्हा एकदा वाढवले ​​आहेत. बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, SBI ने सर्व मुदतीसाठी त्यांच्या FD च्या व्याजदरात 20 बेस पॉईंट्सपर्यंत वाढ केली आहे. नवीन व्याजदर 2 कोटी रुपयांपेक्षा कमी मुदत ठेवींवर लागू असणार आहेत.

नवीन दर 15 ऑक्टोबरपासून लागू

FD वर वाढलेले व्याजदर 15 ऑक्टोबर 2022 पासून लागू होणार आहे. बँकेने दोन महिन्यांच्या अंतरानंतर रिटेल एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे. SBI च्या वेबसाइटनुसार, FD व्याजदरात 10 बेसिस पॉइंट (bps) पासून 20 bps पर्यंत वाढ केली आहे.

  • एसबीआयने दिलेल्या माहितीनुसार, 7 दिवस ते 45 दिवसांच्या मुदतीच्या FD वर आता 3 टक्के व्याजदर मिळेल.
  • 46 दिवस ते 179 दिवसांच्या कालावधीत मॅच्युअर होणाऱ्या एफडीवर आता 4 टक्के व्याजदर मिळेल.
  • 180 दिवस ते 210 दिवसांदरम्यान रिटेल एफडीवर 4.65 टक्के व्याजदर असेल.
  • 211 दिवसांपासून ते एक वर्षापेक्षा कमी ठेवींवर 4.70 टक्के व्याजदर मिळेल.
  • 1 वर्ष ते 2 वर्षांपेक्षा कमी मुदतीच्या SBI FD वर 5.60 टक्के व्याजदर मिळेल.
  • 2 वर्षे ते 3 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर 5.65 टक्के व्याजदर मिळेल.
  • 3 वर्ष ते 5 वर्षांपेक्षा कमी मुदतीच्या ठेवींवर 5.80 टक्के व्याजदर मिळेल.
  • आता 5 वर्ष ते 10 वर्षांच्या FD वर 5.85 टक्के व्याजदर असेल.