ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना टागोर पुरस्कार जाहीर

ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना २०१६ या वर्षासाठीचा टागोर पुरस्कार 

PTI | Updated: Oct 26, 2018, 11:27 PM IST
ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना टागोर पुरस्कार जाहीर title=

मुंबई : आंतरराष्ट्रीय किर्तीचे ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडून देण्यात येणारा २०१६ या वर्षासाठीचा टागोर पुरस्कार जाहीर झाला आहे. एक कोटी रुपये, प्रमाणपत्र आणि पारंपारिक हस्तकला शिल्प असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. 

राम सुतार यांच्यासह मणिपुरी शास्त्रीय नर्तक राजकुमार सिंघजीत सिंह यांना २०१४ या वर्षासाठीचा तर बांग्लादेशातील छायानौत या सांस्कृतिक संस्थेला २०१५ या वर्षासाठीचा टागोर पुरस्कार जाहीर झाला आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने पुरस्कार विजेत्यांची नावं निवडली आहेत. या समितीत सरन्यायाधीश रंजन गोगोई यांचाही समावेश आहे. केंद्र सरकारने रविंद्रनाथ टागोर यांच्या दीडशेव्या जयंतीपासून हे पुरस्कार देण्यास सुरुवात केली आहे. सुतार यांना पुरस्कार जाहिर झाल्यावर केंद्रीय मंत्री महेश शर्मा यांनी नोएडा येथे त्यांचे अभिनंदन केले.