बंगळुरू : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, आज राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची जाहीर सभा होणार आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी शरद पवार आज बेळगावमध्ये दाखल झाले आहेत. शरद पवार सांब्रा विमानतळावर आल्यानंतर बेळगाववासियानी जंगी स्वागत केलं. आज होणाऱ्या सभेमध्ये शरद पवार, काय बोलणार याकडे सीमावासीय बांधवांचं लक्ष लागून आहे.
निवडणूक आयोगान शरद पवार यांच्या सभेला काही अटी आणि शर्तीवर उशीरा परवानगी दिली आहे. दरम्यान विमानतळावर शरद पवार पोहचल्यानंतर त्यांना सीमा प्रश्नाबाबत विचारणा करण्यात आली. त्यावेळी नंतर बोलतो अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
बेळगावात शिवसेना खासदार संजय राऊतांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. राऊत यांच्यावर निवडणूक आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. राऊत यांच्यासह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. गुरुवारी भाग्यनगर इथल्या रामनाथ मंगल कार्यालयात बेळगांव लाईव्ह या वेबसईडचा पहिला वर्धापन दिन झाला.
या कार्यक्रमात शिवसेनेचे खासदार संजय राऊत, किरण ठाकूर, दीपक दळवी, उपमहापौर पुजारी उपस्थित होते. यावेळी दोन भाषिकमध्ये तेढ निर्माण करण्यारं वक्तव्य केल्याचा ठपका ठेऊन राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.