पाटणा : लोकसभा निवडणूक जवळ येत असताना, राजकीय वातावरण देखील तापत आहे. एनडीएमधील जागावाटप आणि उमेदवारांची अजून अधिकृत घोषणा झालेली नाही. पण लवकरच याची घोषणा होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी भाजप आणि जेडीयूकडून सांगण्यात आलं होतं की, जागावाटप लवकरच स्पष्ट होईल.
काही सीटच्या बाबतीत अजूनही बिहारमध्ये वाटाघाटी सुरू आहेत, त्यातील पटना साहिब सर्वात महत्वाची जागा आहे. या जागेवरून वाटाघाटी सुरू आहेत, पण लवकरच या जागेची घोषणा होणार आहे. या जागेवरून आता अभिनेता शत्रुघ्न सिन्हा हे लढणार नसून, सुशील कुमार मोदी लढणार असल्याची माहिती झी न्यूजच्या सुत्रांनी दिली आहे.
लोकसभा निवडणूक २०१४ नंतर शत्रुघ्न सिन्हा यांना केंद्रीय कॅबिनेटमध्ये जागा देण्यात आली नव्हती. यानंतर शत्रुघ्न सिन्हा यांनी नाराजी व्यक्त केली होती. या दरम्यान अनेक राज्याच्या निवडणुका झाल्या यात देखील त्यांचं नाव स्टार प्रचारकांच्या यादीत घेण्यात आलं नाही. यानंतर शत्रुघ्न सिन्हा आपली नाराजी जाहीर व्यक्त करत होते.