नवी दिल्ली : Shinde Group Now claims Shiv sena Delhi party Office : शिंदे गटाच्या 12 खासदारांनी स्वतंत्र गटाची स्थापना केली. त्यांनंतर लोकसभा अध्यक्षांनी त्यांना अधिकृत मान्यता दिली. आता लोकसभेच्या गटनेतेपदी राहुल शेवाळे यांची निवड करण्यात आलेय. आता शिंदे समर्थक 12 खासदार दिल्लीतील शिवसेना कार्यालयाची मागणी करणार आहेत, अशी माहिती पुढे आली आहे. दरम्यान, तर शिंदे गटाचे खासदार चंद्रावरही ऑफिस थाटतील असा टोला, संजय राऊत यांनी हाणला आहे.
शिवसेनेच्या 12 खासदारांच्या गटाला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मान्यता दिली आहे. खासदार राहुल शेवाळे गटनेते तर भावना गवळी प्रतोद म्हणून मान्यता दिली आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे गटाने विनायक राऊत यांनी गटनेतपदावरुन हकालपट्टी केली आहे.
शिवसेनेच्या आमदारांपाठोपाठ लोकसभेतील खासदारांनी देखील पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विरुद्ध बंड पुकारल्याने आता लोकसभेच्या संसदीय पक्षातही उभी फूट पडली आहे. शिंदे गटाला अधिकृत मान्यता मिळाल्यानंतर या गटाने लोकसभेतील शिवसेना कार्यालय ताब्यात घेण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत.
शिवसेनेचे 12 खासदार मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले. या 12 जणांनी स्वतंत्र गटाची स्थापना स्थापना करीत लोकसभेच्या गटनेतेपदी राहुल शेवाळे यांची, तर प्रतोदपदी भावना गवळी यांची निवड केली. या गटास लोकसभेत शिवसेनेचा स्वतंत्र गट म्हणून मान्यता द्यावी, असे पत्र त्यांनी लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांना दिले. त्यानंतर शेवाळे यांना शिवसेनेचे नवे गटनेते म्हणून लोकसभा अध्यक्षांनी मान्यता दिली होती.