Gold मध्ये गुंतवणूकीची सुवर्णसंधी; पुढच्या दिवाळीपर्यंत प्रतितोळे 5 हजारांचा होईल फायदा

 या दिवाळीत सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

Updated: Oct 31, 2021, 11:11 AM IST
Gold मध्ये गुंतवणूकीची सुवर्णसंधी; पुढच्या दिवाळीपर्यंत प्रतितोळे 5 हजारांचा होईल फायदा title=

मुंबई : या दिवाळीत सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे. कोविड 19 प्रतिबंधक निर्बंधांमध्ये शिथिलता आणि अर्थव्यवस्थेत होणारी सुधारणा याचा परिणाम सोन्याच्या किंमतींवर दिसून येत आहे. देशात जुलै-सप्टेंबर 2021 तिमाहीदरम्यान, सोन्याच्या किंमतींमध्ये तेजी नोंदवण्यात आली आहे. या तीन महिन्यात सोन्याची आयात 740 टनांची झाली आहे.

ब्रोकरेज हाऊस मोतिलाल ओस्वालने फायनांशिअल सर्विसेजचे म्हणणे आहे की, सध्याच्या स्थितीत सोन्यात गुंतवणूकीची संधी आहे. पुढील एका वर्षात सोन्याच्या किंमतींमध्ये 52 हजार - 53 हजार रुपये प्रति तोळे पोहचण्याची शक्यता आहे. सध्याच्या दरांवरून खरेदी केल्यास 5000 रुपये प्रति तोळे इतका फायदा होऊ शकतात.

सोन्याचे भाव 25 टक्कांनी वाढले
रिपोर्टच्या मते, 2019 आणि 2020 मध्ये सोन्याच्या किंमतींमध्ये तेजी दिसून आली आहे. 2019 मध्ये सोन्याच्या किंमतींमध्ये 52 टक्क्यांनी आणि 2020 मध्ये साधारण 25 टक्क्यांची तेजी आली आहे. परंतु 2021 मध्ये काही प्रमाणात सोन्याच्या किंमतींमध्ये काहीशी घसरण नोंदवण्यात आली.

2020 मध्ये दिवाळीमध्ये कोरोनामुळे अनेक निर्बंध होते. या दिवाळीत त्यातुलनेत निर्बंध कमी आहेत. दुकाने पूर्ण क्षमतेने उघडली आहेत. त्यामुळे सोन्याच्या आयातीतही वाढ झाली आहे. वर्ल्ड गोल्ड काउंसिंलच्या आकडेवारीनुसार, सोन्याची आयात सप्टेंबरपर्यंत 740 टन होती. सोन्यात आलेल्या तेजीने गुंतवणूकदारांना चांगला रिटर्न दिला आहे.