Success Story : अवघ्या 10 हजार रुपयांत झालेली Flipkart ची सुरुवात; कोण होते त्याचे जन्मदाते, जाणून घ्या

ऑनलाईन शॉपिंगसाठी बहुचर्चीत असेलेल्या प्लॅटफॉर्मपैकी एक म्हणजे Flipkart. आज आम्ही तुम्हाला, दोन मित्रांनी एकत्र येऊन सुरु केलेल्या Flipkart कंपनीच्या संर्घषाबद्दल सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया...

Updated: Aug 8, 2022, 11:28 AM IST
Success Story : अवघ्या 10 हजार रुपयांत झालेली Flipkart ची सुरुवात; कोण होते त्याचे जन्मदाते, जाणून घ्या title=

 

मुंबई : ई-कॉमर्स क्षेत्रातील भारतातली सुप्रसिद्ध कंपनी म्हणजे Flipkart. अमेरिकेच्या वॉलमार्ट कंपनीने Flipkart कंपनीचे 75 टक्के शेअर्स 1 लाख कोटी रुपयांमध्ये खरेदी केले आहेत. या कंपनीला अग्रेसर बनवण्यासाठी सचिन बंसल आणि विनी बंसल यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे. या कंपनीची सुरुवात केवळ 10 हजार रुपयांच्या गुंतवणूकीतून केली आहे. चला तर मग Flipkart च्या संघर्ष जाणून घेऊया...

Flipkart ने पुस्तकांची विक्री करुन सुरु केला व्यवसाय...

सचिन बंसल आणि विनी बंसल यांनी 2007 ला केवळ 10 हजार रुपयांची गुंतवणूक करुन Flipkart कंपनीची सुरुवात केली. या दोघांचं शिक्षण हे आयआयटी दिल्ली येथून झालं आहे. 
Flipkart कंपनीने सुरुवातीच्या काळात पुस्तकांची विक्री करुन व्यवसाय पुढे नेला. 10 हजारांपासून सुरु झालेली Flipkart कंपनी आता 1.32 लाख कोटी रुपयांची झालीये. काही रिपोर्ट नुसार, एकेकाळी या दोघांनी स्कूटरवर काही सामानांची विक्री केली आहे. कंपनीच्या सुरुवातीला 10 दिवस एकही ऑर्डर मिळाली नव्हती.

सचिन बंसल आणि विनी बंसल यांनी बंगळूरूतून Flipkart कंपनीची सुरुवात केली होती. एका अपार्टमेंटच्या टूबीएचके फ्लॅट भाड्याने घेऊन आणि दोन कंप्यूटरसोबत या कंपनीची सुरुवात झाली. सुरुवातीच्या 10 दिवसात एकही ऑर्डर न मिळाल्यानंतर पहिली ऑर्डर आंध्रप्रदेशाच्या एका ग्राहकाने पहिलं पुस्तक बुक केलं होत. या पुस्तकाचं नाव 'Leaving Microsoft to Change the World' असं होतं.

सचिन आणि विनी बंसल यांचं आडनाव जरी एकच असलं तरी ते नातेवाईक नाहीयेत. ते केवळ बिझनेसपार्टनर आहेत. या दोघांनी चंदीगडच्या सेंट ऐनीज कॉन्वेंट स्कूलमध्ये शिक्षण घेतलं आहे. हे दोघेही चंदीगडचे रहिवासी आहेत. या दोघांनी आयआयटी दिल्ली येथून पदवी घेतली आहे. आयआयटीनंतर 2005ला सचिन बंसल यांनी टेकस्पेन कंपनी जॉईन केलं आणि त्यानंतर काही महिन्यांनंतर एक वरिष्ठ सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम केलं. 2007 ला सुरु केलेल्या या कंपनीने पुस्तकांच्या व्यतिरिक्त इलेक्ट्रॉनिक्स, घरगूती वस्तू, कपडे आणि इतर वस्तू देखील खरेदी करता येतात.