मुंबई : उन्हाळ्यात आपण आईस्क्रीम खूप आवडीने खातो. लहानपणी फेरीवाले आईस्क्रीम विकायचे. हळूहळू अनेक बड्या कंपन्या या व्यवसायात उतरल्या. अशीच एक आइस्क्रीम कंपनी आहे नॅचरल्स नावाची. आजकाल, त्याच्या विविध चवींची विशेषत: नैसर्गिक फळांची खूप चर्चा आहे. पण तुम्हाला माहीत आहे का? की, रघुनंदन एस कामथ या व्यक्तीने ही कंपनी सुरु केली त्यांचे वडील फळं विकायचे. ते आईस्क्रीम किंग कसे बनले ते जाणून घेऊया...
फळं विकायचे, तिथून आली कल्पना
रघुनंदन एस कामथ यांचा जन्म कर्नाटकातील एका छोट्या गावात झाला. ७ भावंडांमध्ये ते सगळ्यात लहान होते. लहानपणी त्यांचे वडील फळं विकायचे. एका मुलाखतीदरम्यान कामथ यांनी सांगितलं होतं की, फ्लेवर्ड आइस्क्रीम विकण्याची कल्पना त्यांना तिथूनच आली. कामथ 40 मुलांना शिकवण्यासाठी फक्त दोन शिक्षक असलेल्या शाळेत जायचे. ते इंग्रजीत खूपच कमकुवत होते. परिस्थिती अशी होती की, इयत्ता 10वीत त्यांना दोनदा शाळेतून काढून टाकण्यात आलं होतं.
मुंबईनं बदललं नशीब
वयाच्या 14 व्या वर्षी कामथ यांचं कुटुंब जुहू, मुंबई येथे स्थलांतरित झालं. जिथे संपूर्ण कुटुंब एका छोट्याशा चाळीत राहत होतं. कामथ यांच्या मोठ्या भावाने तिथे साऊथ इंडियन रेस्टॉरंट उघडलं. दहावीत शाळा सोडल्यानंतर ते आपल्या भावाच्या रेस्टॉरंटमध्ये ते काम करू लागले. तिथे त्यांनी आपल्या भावाला आईस्क्रीमची कल्पना दिली. मात्र त्यांचा भाऊ याबाबत गंभीर नव्हता.
1984मध्ये तोटा झाल्यामुळे रेस्टॉरंट बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. अशा स्थितीत कामथ यांच्या वाट्याला सुमारे तीन लाख रुपये आले. जुहूच्या कोळीवाड्यात त्यांनी नॅचरल नावाचं दुकान उघडलं. तिथे त्यांनी पावभाजीसोबत आईस्क्रीम विकण्यास सुरुवात केली. खरंतर त्यामागे एक युक्ती होती. लोक आधी मसालेदार पावभाजी खातील आणि नंतर गोड आईस्क्रीम. हळूहळू आईस्क्रिम खूप प्रसिद्ध झालं. दरम्यान, इनकम टॅक्स डिपॉर्टमेंटची यावर रेड पडली. त्यांच्याच नातेवाईकानं या नावानं दुकान उघडलं. एका मुलाखतीत कामथ म्हणले की, टॅक्स आणि हे सगळं जाणून घेण्याइतपत ते शिकले नव्हते. नातेवाईकांनी दुकान उघडल्यानंतर त्यांना साखळीची आयडिया सुचली यानंतर त्यांनी मुंबईत पाच दुकाने उघडली.
मोठमोठ्या कंपन्यांशी टक्कर झाली तेव्हा आईच्या स्वयंपाकघरातून ही कल्पना सुचली
खरंतर, एकीकडे नॅचरलचं नावं वाढत चाललं होतं. तर दुसरीकडे उदारीकरणानंतर परदेशी कंपन्या भारतात आल्या. अशा परिस्थितीत कामथ यांच्यासमोर नवं आव्हान उभं राहिलं. मात्र, त्यांनी त्यांच्या आईस्क्रीमला त्यांच्याशिवाय भारतीय चव जोडली. ज्यामध्ये कोथिंबीर, फणस, नारळ आणि आंबा यांसारख्या आईस्क्रीमचा समावेश होता. दिलेल्या एका मुलाखतीत ते म्हणाले की, त्यांना त्यांच्या आईच्या स्वयंपाकघरातून फ्लेवर्सची कल्पना आली. जिथे ती चिंच वापरायची. अशा प्रकारे त्यांनी भारतीय फळांपासून आईस्क्रीम बनवण्याचं देशी मशीनही बनवलं.
आज 100 कोटींच्या वर आहे उलाढाल
यानंतर कामथ यांनी जो वेग पकडला त्यानंतर के कधी थांबले नाहीत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आजच्या काळात ते 100 कोटींहून अधिक उलाढाल करतात. सोबतच, 2018 साली त्यांची कंपनी टॉप-10 ब्रँडमध्ये सामील झाली होती.