Pradhanmantri Suryodaya Yojana: ज्या क्षणाची रामभक्तांनी गेली कित्येक वर्षं वाट पाहिली, तो सुवर्णक्षण आज अख्ख्या जगानं अनुभवला. अयोध्येतल्या राममंदिरात रामाची प्राणप्रतिष्ठा झाली. अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्येतल्या राममंदिरात प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. राममंदिर लोकार्पण सोहळ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्वात मोठ्या योजनेची घोषणा केली आहे. सूर्योदय योजना असे या सोजनेचे नाव आहे.
सरकार 'प्रधानमंत्री सूर्योदय योजना' सुरू करणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राममंदिर लोकार्पण सोहळ्यानंतर जाहीर केले. सरकारची ही अत्यतं महत्वकांक्षी योजना आहे. याचा थेट फायदा देशातील सर्वसामान्य जनतेला होणार आहे. एक कोटी घरांवर रुफटॉप सोलर उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवून सरकार 'प्रधानमंत्री सूर्योदय योजना' सुरू करणार आहे.
सूर्यवंशी भगवान श्री राम के आलोक से विश्व के सभी भक्तगण सदैव ऊर्जा प्राप्त करते हैं।
आज अयोध्या में प्राण-प्रतिष्ठा के शुभ अवसर पर मेरा ये संकल्प और प्रशस्त हुआ कि भारतवासियों के घर की छत पर उनका अपना सोलर रूफ टॉप सिस्टम हो।
अयोध्या से लौटने के बाद मैंने पहला निर्णय लिया है कि… pic.twitter.com/GAzFYP1bjV
— Narendra Modi (@narendramodi) January 22, 2024
सूर्योदय योजना नेमकी आहे तरी काय?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मिडियावर एक पोस्ट शेअर करत या योजनेची माहिती देशवासियांना दिली आहे. अयोध्येतून परतल्यानंतर मी माझा पहिला निर्णय घेतला आहे की आमचे सरकार एक कोटी घरांवर छतावर सौर पॅनल बसवणार आहे. हेच लक्ष्य घेऊन सरकरा 'प्रधानमंत्री सूर्योदय योजना' सुरू करणार आहे. या योजनेमुळे गरीब आणि मध्यमवर्गीयांचे वीज बिल कमी होईलच. याशिवाय पण ऊर्जा क्षेत्रात देश स्वावलंबी बनेल असे पंतप्रधान मोदी यांनी सोशल मिडिया पोस्टमध्ये म्हंटले आहे. तसेच हे सोलर पॅनेल कसे असतील याचे फोटो देखील पंतप्रधान मोदी यांनी शेअर केले आहेत.
मोदींनी गर्भगृहात विधिवत पूजा केली. महाराष्ट्रातल्या पुरोहितांसह देशभरातल्या पुरोहितांच्या मंत्रोच्चारात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यावेळी पंतप्रधान मोदींसह गाभा-यात सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन मेहता आणि पुजारी उपस्थित होते. मोदींनी पूजा केल्यानंतर रामलल्लाच्या चांदीच्या मूर्तीची पूजा करण्यात आली. त्यानंतर रामलल्लाच्या मूर्तीसमोरचा पदडा हटवण्यात आला आणि रामलल्लाचं सुंदर दर्शन जगाला झालं.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अयोध्येतल्या मंदिरात रामाची प्राणप्रतिष्ठा केली... विधिवत पूजा झाल्यानंतर मोदींनी रामाच्या चरणी फुलं वाहिली. त्यानंतर पंतप्रधानांनी राममूर्तीची पंचारती ओवाळून आरती केली. मंदिरातले मुख्य उपचार पार पडल्यानंतर मोदींनी रामाच्या मूर्तीला प्रदक्षिणा घालत रामासमोर साष्टांग नमस्कार घालून नमन केलं.