मुंबई : 1993 मुंबई बॉम्ब ब्लास्ट प्रकरणात मुंबईच्या स्पेशल टाडा कोर्टाने सोमवारी दोषींवरील शिक्षेचा निर्णय टाळला आहे. आता कोर्ट गँगस्टर अबु सलेमसह ७ इतर दोषींविरोधात १६ जूनला शिक्षा सुनावणार आहे. अबु सलेम याच्यासह करीमुल्लाह खान, फिरोज अब्दुल रशीद, ताहिर मर्चेंट आणि मुस्तफा डोसा हे देखील यात आरोपी आहेत. सलेमवर हत्या आणि जबरदस्ती वसूली प्रकरणातही आरोपी आहे.
टाडा कोर्टाने २००६मध्ये याकूब मेमनसह १०० जणांना दोषी ठरवलं होतं. मेमनला ३० जुलै २०१५ ला फाशी देण्यात आली. १२ मार्च १९९३ ला झालेल्या १३ बॉम्बस्फोटात मुंबई हादरली होती. यामध्ये जवळपास २५७ लोकांचा मृत्यू झाला होता. तर ७१३ लोकं जखमी झाले होते.
सलेमवर भारतात अनेक तक्रारी नोंद आहेत. सलेम सध्या नवी मुंबईतील तळोजा जेलमध्ये आहे. २००५ मध्ये पोर्तुगालमधून त्याला भारतात आणलं होतं. सलेमला १९९५ मध्ये मुंबईतील बिल्डर प्रदीप जैन यांची हत्येच्या प्रकरणात आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली होती.