अहमदनगर : तामिळनाडू राज्यातील एका १० जणांच्या टोळीने मध्यप्रदेश आणि उत्तरखंडमध्ये हातचलाखी करत एटीएमचे तब्बल ८५ लाख लुटले. मात्र सिसिटीव्हीत कॅमेराबंद झालेले आरोपी थेट शिर्डीत जेरबंद झालेत.
तीन राज्याच्या पोलिसांनी संयुक्त कारवाई करत ही चालबाज टोळी पकडलीय. बँकेचे एटीएम मध्ये पैसे भरत असताना गार्ड व व्हँन चालकाचे लक्ष विचलित करुन रक्कम लंपास करायचे. भोपाळ, हरिद्वार येथील एटीएमची कैश व्हॅन मधून तब्बल ८५ लाख रुपये चलाखीने चोरून शिर्डी गाठणाऱ्या १० जणांच्या टोळीतील ७ आरोपी पकडण्यात पोलिसांना अखेर यश आले आहे.
तीन जण मात्र फरार होण्यात यशस्वी झाले आहेत. विशेष म्हणजे ही टोळी तामिळनाडु राज्यातील असून टोळीतील आरोपींची ओळख पटली असून त्यांनी गुन्ह्याची कबूली दिली आहे.मोबाईल लोकेशन वरून ट्रेस झाल्याने छत्तीसगड व मध्यप्रदेश पोलीस या आरोपीच्या मागावर शिर्डीत पोहचून कारवाई केलीय.