Petrol-Diesel च्या किमतींमध्ये दिलासा? झटपट चेक करा आजचे दर
भारतीय तेल कंपन्यांनी आजचे पेट्रोल-डिझेलचे (Petrol-Diesel) दर जारी केले आहेत. त्यामध्ये आज तेल कंपन्यांकडून देशातील पेट्रोल-डिझेलच्या दरांत कोणतीही वाढ किंवा घट करण्यात आलेली नाही.
Updated: Aug 20, 2022, 09:18 AM IST
Petrol-Diesel Price Today : घराच्या बाहेर पडण्यापूर्वी गाडीची टाकी फूल्ल करा. कारण भारतीय तेल कंपन्यांनी आजचे पेट्रोल-डिझेलचे (Petrol-Diesel) दर जारी केले आहेत. त्यामध्ये आज तेल कंपन्यांकडून देशातील पेट्रोल-डिझेलच्या दरांत कोणतीही वाढ किंवा घट करण्यात आलेली नाही.
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) च्या अधिकृत वेबसाइटवर iocl.com नं पेट्रोल-डिझेलचे जारी करण्यात आले आहे. नव्या पेट्रोल-डिझेलच्या दरांनुसार, आजही देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर दरानं विकलं जात आहे. तर देशातील राजधानीचं शहर असणाऱ्या दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर दरानं विकलं जात आहे.
महाराष्ट्रातील इतर शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर
शहर पेट्रोलच्या किमती - डिझेलच्या किमती
मुंबई106.2594.22
पुणे 10592
नागपूर 106.0392.58
नाशिक106.7493.23
हिंगोली107.2993.80
परभणी108.9295.30
धुळे 106.0592.58
नांदेड 108.2494.71
रायगड 105.9692.47
अकोला 106.0592.55
वर्धा 106.5693.10
नंदुरबार 106.9993.45
वाशिम106. 3793.37
चंद्रपूर106.1492.70
सांगली 105.9692.54
जालना107.76 94.22
दर कुठे आणि कसे पाहाल?
IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.
इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.
x
By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking
this link