Video : उड़ता पंजाब! तरुणीने खुलेआम घेतलं इंजेक्शन आणि पुढे...

Trending Video : तुम्ही पाहू शकता एक तरुणी भरदिवसा खुलआम आपल्या मांडीवर एक इंजेक्शन घेते आणि त्यानंतर तिची जी अवस्था होते तेव्हा पाहून...  

Updated: Nov 11, 2022, 03:54 PM IST
Video : उड़ता पंजाब! तरुणीने खुलेआम घेतलं इंजेक्शन आणि पुढे...  title=
trending video Drug Abuse in Amritsar Woman Goes Viral nmp

Drug Abuse in Amritsar : सोशल मीडियावर (Social media) एका तरुणीचं विचित्र कृत्य कॅमेऱ्यात कैद झालं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा (video viral on social media) पसरत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी हैराण झाले आहे. चित्रपटात दिसणारं दृश्य खऱ्या आयुष्यात दिसल्यावर नेटकऱ्यांना धक्का बसला आहे. भर दिवसा खुलेआम या तरुणीने जे कृत्य केलं हे त्यानंतर तिची झालेली अवस्था पाहून यूजर्स निशब्द झाले आहेत. 

उड़ता पंजाब! (Udta Punjab)

तुम्हाला अभिनेता शाहिद कपूर (Actor Shahid Kapoor), अभिनेत्री करीना कपूर खान (Actress Kareena Kapoor Khan) आणि अभिनेत्री आलिया भट्टचा (Actress Alia Bhatt) उड़ता पंजाब हा चित्रपट आठवतो का? त्या चित्रपटात पंजाबमधील ड्रग्जचं वास्तव (reality of drugs in Punjab) अधोरेखित करण्यात आलं होतं. पंजाबमध्ये तरुणांना ड्रग्जने विळखा घातला आहे. याच भयान वास्तव सांगणारा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतो आहे. 

काय आहे या व्हिडीओमध्ये?

तुम्ही पाहू शकता एक तरुणी भरदिवसा खुलआम आपल्या मांडीवर एक इंजेक्शन घेते आणि त्यानंतर तिची जी अवस्था होते तेव्हा पाहून आपल्या अंगावर काटा येतो. त्या तरुणीने ड्रग्जचं इंजेक्शन (Drug injection) घेतलं आहे. पंजाबमध्ये काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्जची विक्री होते. 

पवित्र भूमी नशेचा अड्डा!

शिखांसाठी पवित्र शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मकबूलपुरा ड्रग्जशी संबंधित घटनांमुळे अनेकदा चर्चेत असतो. हा व्हिडीओ अमृतसरच्या (Amritsar)मकबूलपुरा या भागातील असल्याचं बोलं जातं आहे. दरम्यान पंजाब पोलिसांची या परिसरात करडी नजर असून हा व्हिडीओ सप्टेंबर महिन्यातील आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी 12 संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.