Bihar Viral Vidoe : सोशल मीडिया हा व्हिडीओचा खजिना आहे. इथे प्रत्येत सेकंद सेकंदला एका व्हिडीओ व्हायरल होतं असतो. काही व्हिडीओ तर सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर तुफान व्हायरल होत असतात. त्यानंतर सोशल मीडियावर तो व्हिडीओ ट्रेंडिंग असतो. यात काही व्हिडीओ गाणे आणि डान्सचे असतात तर काही वधू वराचे तर काही अंगावर काटा आणणारे भयानक व्हिडीओ असतात. सध्या सोशल मीडियावर एका विचित्र व्हिडीओने सर्वसामान्यांना थक्क केलं आहे.
अचानक एका कालव्यात घाणीचं साम्राज्य असलेल्या पाण्यात बघ्यावं तिकडे पैसेचं पैसे होते. ही आश्चर्यकारक घटना आणि विचित्र प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. लोकांना हे पैशांचे बंडल दिसल्यानंतर तिथे लोकांची पैशा लुटण्यासाठी झुंबड उडाली. नोटांचं बंडल गोळ्या करण्यासाठी लोकांनी थेट कचरा आणि घाण पाण्यात थेट उड्या मारल्या. (trending video villagers finding bundles of money in canal crowds collect notes viral Bihar video on Social media)
या नाल्यातील बंडमध्ये 100, 200 आणि 500 च्या नोटा असल्याचं बोलं जातं आहे. या नोटांचं बंडल गोळा करण्यासाठी लोकांमध्ये जणू काही स्पर्धातच लागली होती. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहून शकता नोटांचे बंडल पाण्यात तरंगताना दिसल्यानंतर पैसे लुटण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली. तर बघ्यांची गर्दीही मोठ्या प्रमाणात आहे. हा आश्चर्यकारक व्हिडीओ पाहून नेटकरी अवाक् झाले आहेत.
ही विचित्र आणि धक्कादायक घटना बिहारमधील साासाराम शहरातील आहे. मुफस्सिल पोलीस ठाण्याच्या मुरादाबादजवळील कालव्यातील ही घटना आहे. पोलिसांना घटनेची माहिती मिळतातच त्यांनी घटनस्थळी धाव घेतली आणि लोकांवर नियंत्रण आलं. मात्र एवढे पैशांचे बंड आले कुठून आणि हे पैसे खरे आहेत की बनावट याचा शोध सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार पहाटेच्यावेळी नोटांचे बंडले पाण्यात तरंगताना दिसल्यानंतर लोकांनी पाण्यात उडा घेतल्या.
Currency note bundles of ₹100 and ₹10, were found floating in a sewer in a Bihar town, Sasaram, around 150 km from capital Patna. pic.twitter.com/vl0q1Dzj4C
— Pagan (@paganhindu) May 6, 2023
हा व्हिडीओ @paganhindu नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून थक्क झाले असून हा व्हिडीओ सगळ्या सोशल मीडिया साईडवर व्हायरल होतो आहे.