Upcoming IPO in 2023: येत्या काही दिवसातच आपण नवीन वर्षात पदार्पण करणार आहोत. तेव्हा येत्या काळात आपले आयुष्य अधिक सुखी समृद्धीचे व्हावे यासाठी आपण नक्कीच कुठेतरी मोठी गुंतवणूक करण्याच्या विचारात असूच. तेव्हा येत्या वर्षात कुठले कुठले आयपीओ येण्याच्या मार्गावर आहे. याचा तपास आपण आपल्या परीने सुरू केला असेल. पण तुमचं काम आम्ही जरा हलकं करतोय, आणि येत्या नव्या वर्षातले हे टॉप 5 आयपीओ तुम्हाला कमवण्याची उत्तम संधी देऊ शकतात. तेव्हा जाणून घेऊया या नव्या पाच येणाऱ्या आयपीओंबद्दल! समोर आलेल्या माहितीनुसार येत्या वर्षी जवळपास 90 कंपन्या पुढील वर्षी IPO आणण्याच्या तयारीत आहेत. या आयपीओतून 1.4 लाख कोटींचा निधी गोळा करण्याचा मानस आहे. (Upcoming IPO in 2023 Top 5 IPOs to watch out for in 2023 Stock Market News Marathi)
येत्या काळात आपल्याला अनेक आव्हानांना सामोरे जायचे आहे. त्यामुळे आपल्यासाठी आर्थिक गुंतवणूक (Financial Investment) ही फार महत्त्वपुर्ण ठरणार आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक आर्थिक घडामोडी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर (International Share Market) सुरू आहेत त्यामुळे शेअर मार्केटमध्ये वेगवेगळ्या घडामोडी होत आहेत.
यंदाच्या वर्षी आरबीआयनं व्याजदारातही मोठी वाढ केली होती. त्यामुळे महागाईच्या पार्श्वभुमीवर ही वाढ कमी करण्यासाठी रिझर्व्ह बॅंकनं व्याजदरात (RBI Repo Rate) मोठी वाढ केली आहे. ही वाढ पुढच्या वर्षी कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महागाई आणि व्याजदराचं संकट कमी झाल्यावर आपल्याला पुढच्या वर्षी गुंतवणूकीच्या दृष्टीनंही चांगली कमाई करण्याची संधी उपलब्ध होऊ शकते. सध्या भारतीय शेअर मार्केटमध्ये चांगली तेजी आणि वाढ पाहायला मिळते आहे. त्यामुळे नव्या वर्षी याचा आपल्या गुंतवणूकदारांना मोठा फायदा होईल.
1. ओव्हायओ (OYO) IPO - 8400 कोटी
2. स्विगी (Swiggy) IPO - 8300 कोटी
3. आधार हाऊसिंग फायनान्स (Adhar Housing Finance) - 7300 कोटी
4. मॅनकाईन्ड फार्मा (Mindkind Pharma) - 5500 कोटी
5. फॅब इंडिया (Fab India) - 4000 कोटी
6. इक्सिगो (Ixiago) - 1600 कोटी
7. यात्रा (Yatra) - 750 कोटी
या डिसेंबर महिन्यापर्यंत एकूण 36 कंपन्यांनी त्यांचे आयपीओ आणले आहेत. त्यातून 56,940 कोटी रूपयांचा फंड गोळा केला आहे. 2021 हे वर्ष आयपीओच्या दृष्टीनं चांगले होते. तेव्हा कंपन्यांनी 1.2 लाख कोटींचा फंड उभारला होता. कोविडच्या काळात 26,611 कोटींचा फंड उभा राहिला होता. काही तज्ञांच्या मते, येत्या वर्षात मंदी असल्यानं पुढील वर्षी IPO द्वारे फंड गोळ्या करण्याच्या योजना कमी होऊ शकतात. बाजारातही कदाचित मंदी येऊ शकते. तर काहींच्या मते, येणारं वर्ष हे आर्थिकदृष्ट्या सुफल असू शकेल. तुम्हीही जर या आयपीओतून गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला नक्कीच दमदार फायदा मिळाला असेल परंतु येत्या वर्षाही येणाऱ्या आयपीओतून तुम्हाला चांगला फायदा मिळू शकतो. तेव्हा या आयपीओंकडे बारिक लक्ष ठेवा, गुंतवा आणि कमवा.