कोणाचा मृत्यू कधी आणि कोणत्या वेळी काही सांगता येत नाही. असाच काहीसा प्रकार उत्तर प्रदेशातील बरेली येथे समोर आला आहे. मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीत एक व्यक्ती फिल्मी गाण्यावर डान्स करत होता. मात्र अचानक नाचत असताना हा व्यक्ती बेशुद्ध पडला. सुरुवातीला कोणालाच काही समजले नाही, पण जवळ जाऊन त्याला पाहिले तर त्या व्यक्तीचा मृत्यू झालेला. हा संपूर्ण प्रकार कॅमेरामध्ये कैद झाला आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
जनकपुरी येथील रहिवासी असलेले प्रभात कुमार उर्फ प्रेमी गुरुवारी देलापीर येथील हॉटेलमध्ये मानव सेवा क्लबचे सदस्य विशाल मेहरोत्रा यांच्या वाढदिवसाच्या पार्टीला गेले होते. प्रभात कुमार हे IVRI मध्ये सहाय्यक तंत्रज्ञ म्हणून नियुक्त आहेत. सर्वजण पार्टीचा आनंद घेत होते. डीजेवर डान्स चालू होता आणि प्रभात कुमार नाचत होते. आजूबाजूला उपस्थित लोक हा आनंदाचा क्षण मोबाईलमध्ये कैद करत होते. मग अचानक प्रभात खाली बसले आणि एका बाजूला कोसळले. त्यानंतर लोकांनी त्याच्याकडे धाव घेतली.
खुशलोक हॉस्पिटलचे डॉक्टर विनोद पगराणीही पार्टीत पोहोचले होते. त्यांनी सांगितले की, प्रभात यांना हृदयविकाराचा गंभीर झटका आला होता. त्या नंतर प्रभार कुमार यांना ताबडतोब सीपीआर देण्यात आला, ज्यामुळे त्यांना थोडावेळ बरे वाटले. त्यानंतर रुग्णवाहिका आली आणि प्रभातला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले मात्र त्यांचा मृत्यू झाला होता.
#LiveStream #Live #death #heartattack #life #bareillynews #bb24
Prabhat ji of #Bareilly was dancing, while dancing, he felt dizzy and left the world.@kap_bee pic.twitter.com/LzdezMuxoa
— Abushahma Khan (@Abushahma007) September 2, 2022
दरम्यान, प्रभात यांच्या मृत्यूने सर्वांनाच धक्का बसला. कुटुंबीयांनी शुक्रवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. हृदयविकाराचा झटका आल्याने मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले नाही.