Video : विद्यार्थ्यांसमोर हा कुठला आदर्श? शाळाच झाली आखाडा, महिला शिक्षकांची WWE

Viral Video : आई वडिलानंतर जर मुलांसाठी आदर्श असतो तो म्हणजे शिक्षक...या शिक्षकांसोबत आयुष्याचा धडा गिरवण्यासाठी आपण शाळेत जातो. पण हीच शाळा कुस्तीचा आखाडा बनली तर...

Updated: Dec 25, 2022, 10:24 AM IST
Video : विद्यार्थ्यांसमोर हा कुठला आदर्श? शाळाच झाली आखाडा, महिला शिक्षकांची WWE title=
video WWE of women teachers Fight front of the students in School viral on Social media nmp

Trending Video :  ज्या गुरुकुल म्हणजे शाळेत (school video) जीवनाचे धडे शिकतो...ज्या गुरुला आपण आपल्या आदर्श मानतो जर तोच शिक्षक विद्यार्थ्यांसमोर (Students video) असं काही करत असेल तर आता पुढची पिढी कशी असेल हा प्रश्नच पडतो. सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ (Shocking video) व्हायरल होतो आहे. या व्हिडिओमध्ये (Viral Video) ज्यांना आपण आदर्श मानतो तेच शिक्षक एकमेकांना हाणामारी करताना दिसतं आहेत. या महिला शिक्षकांनी (female teachers fighting) चक्क शाळेच्या मैदानालाच आखाडा करतात. 

धक्कादायक व्हिडिओ

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, शाळेच्या मुख्याध्यापक आणि एका महिला शिक्षकेमध्ये वाद झाला. या वादाचं रुपांतर शेवटी हाणामारीत झालं. एकमेकांच्या झिंज्या उपटून जोरदार मारामारी केली. या भांडण्यात एक शिक्षिकेनंतर नंतर चक्क पायातील चप्पल घेऊन दुसऱ्या महिला शिक्षेकला तुफान मारलं. या दोघींचं भांडण सोडविण्यासाठी दोन महिलांनी हस्तक्षेप केला. (video WWE of women teachers Fight front of the students in School viral on Social media)

मात्र या दोघी कोणालाही जुमानत नव्हत्या. या दोघींना एवढं पण भान नव्हतं की आपण शाळेत आहोत आणि आपल्याला विद्यार्थी पाहत आहेत. या शाळेत असलेल्या एका हा व्हिडिओ बनवला आणि तो आता सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 

कुठे घडली घटना

ही घटना उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) कासगंजच्या सहावर ब्लॉकमधील बागारी कला गावातील (Kasganj Fight Video) प्राथमिक शाळेत ही घटना घडली. मुख्याध्यापिका विनेश यादव आणि शिक्षका साधना यांच्यात बाचाबाची झाली. एवढंच नाही तर या दोघींनी पोलीस स्टेशनही गाठलं.

त्यांनी एकमेकांविरोधात तक्रारी दाखल केल्या. त्यानंतर पोलिसांनी दोघांनाही वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई केली जाणार आहे.