Women Trending Video: माणूस जेवढा मोठा होत जातो, तेवढ्या त्याच्या संवेदना बोथट होतात, असं म्हटलं जातं. तुकाराम महाराज म्हणतात, मुंगी लहान असते, पण तिला साखरेचा कण खायला मिळतो मात्र, बलाढय हत्तीला माहुताच्या अंकुशाचा मार खावा लागतो. त्यामुळे लहानपण देगा देवा... या ओळचा प्रत्तय प्रत्येकाला कधी ना कधी आला असावा. बालपण म्हणजे सुख... ना कोणता अपेक्षा, ना कोणत्या जबाबदारीचं ओझं. अशातच एका आजीबाईंचा (Old Women) एक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल (Viral Video) होत असल्याचं पहायला मिळतंय.
लहानपोरांना खेळण्याची हौस असते. कधी गार्डनमध्ये (Garden) गेल्यावर घसरगुंडी खेळण्याची मज्जाच वेगळी. अनेकांना त्यांच्या वयात हव्या त्या गोष्टी करता येत नाहीत. त्यामुळे त्या गोष्टींचा आनंद घेण्यासाठी एक वृद्ध महिला गार्डनमध्ये पोहोचते. या महिलेचा घसरगुंडीवरुन पडतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Trending Video) तुफान व्हायरल होत आहे.
घसरगुंडीच्या पायऱ्या चढल्यानंतर (Slump) पिवळ्या रंगाची साडी घातलेल्या महिलेचा आनंद गगनात मावेना झाला. महिला आनंदाच्या भरात घसरगुंडीवर चढते. घरगुंडीवरुन खाली येताना महिला जोरदार आपटते. त्यावेळी महिला थोडी घाबरलेल्या अवस्थेत दिसत आहे.
दरम्यान, Kasthuri Gowda या इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ (Instagram video) शेअर करण्यात आलाय. वृद्ध महिलेचा हा व्हिडिओ (Video of old lady) सध्या तुफान व्हायरल होताना दिसते. या व्हिडिओला अनेक लाईक्स आणि कमेंट्स देखील आल्या आहेत. त्यामुळे कितीही वेदना झाल्या माझं मन संवेदनाशून्य होऊ देऊ नकोस, असं नेटकऱ्यांनी कमेंट करत म्हटलं आहे.