राजस्थान आणि तेलंगणामध्ये मतदानाला सुरूवात

 मरुभूमीचा कौल नेमका कुणाच्या बाजुनं जातो, याची देशभरात उत्सुकता

Updated: Dec 7, 2018, 04:43 PM IST
राजस्थान आणि तेलंगणामध्ये मतदानाला सुरूवात  title=

नवी दिल्ली : गेले अनेक दिवस उडालेला प्रचाराचा धुरळा आणि आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्यानंतर राजस्थान आणि तेलंगणामध्ये आज मतदान होतंय.  राजस्थानात मुख्यमंत्री वसुंधरा राजेंची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. अखेरच्या दिवसांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यात अनेक सभा घेतल्या. सत्तांतराचा इतिहास असलेल्या राज्यात काँग्रेसनंही आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. त्यामुळे मरुभूमीचा कौल नेमका कुणाच्या बाजुनं जातो याची देशभरात उत्सुकता आहे.

निकालाकडे लक्ष 

 तेलंगणामध्ये टीआरएस आणि काँग्रेस-टीडीपी आघाडीमध्ये मुख्य लढत असली तरी दक्षिणेकडे पाय रोवण्याच्या प्रयत्नात असलेल्या भाजपाच्या कामगिरीकडेही लक्ष असेल.

 या दोन राज्यांमधलं मतदान पार पडल्यानंतर ११ तारखेच्या मतमोजणीकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

राजस्थान, तेलंगणासह मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि मिझोराम विधानसभा निवडणुकीची मतमोजणी एकत्र होणार आहे.

या निकालामध्ये २०१९च्या लोकसभा निवडणुकीची छटा दिसणार असल्यामुळे मतदारांचा कौल कुणाला मिळतो, हे पाहणं औत्सुक्याचं आहे.