मुंबई : संपूर्ण देशात कडक उन्हाळा पाहायळा मिळत आहे. उन्हाचे चटके आणि अंगातून घामाच्या धारा निघत आहेत. असे असले तरी येत्या काही दिवसात नागरिकांना उन्हाळ्यापासून थोडा दिलासा मिळेल, अशी शक्यता आहे. हवामान विभागाने तसा अंदाज वर्तवला आहे. येत्या काही दिवसात जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे तापमानात घट होण्याची शक्यता आहे. दरम्यान, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुरा या राज्यांसाठी 'ऑरेंज अलर्ट' जारी केला आहे. या ईशान्येकडील राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदा पाऊस पडण्याची शक्यता आहे. (Weather Update: IMD Orange Alert, Thunderstorm with rain)
पुढील काही दिवस तापमान 40 डिग्रीच्या खाली राहील, असा अंदाज आहे. आज (मंगळवार) पहाटे साडेपाच वाजता दिल्लीतील सफदरजंग वेधशाळेतील तापमान 20.8 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. कमाल तापमान 38 अंश सेल्सिअस राहील.
सोमवारी दिल्लीचे तापमान 40.1 डिग्री सेल्सियस नोंदविण्यात आले, गेल्या 76 वर्षातील मार्च महिन्यातील हे सर्वाधिक तापमान होते. भारतीय हवामान विभागाच्या (आयएमडी) प्रादेशिक पूर्वानुमान केंद्राचे प्रमुख कुलदीप श्रीवास्तव म्हणाले, "सफदरजंग वेधशाळेमध्ये जास्तीत जास्त तापमान 40.1 डिग्री सेल्सियस इतके नोंदविण्यात आले. ते म्हणाले, 31 मार्च 1945 नंतरचा सर्वात उष्ण दिवस होता, तेव्हा जास्तीत जास्त तापमान 40.5 डिग्री सेल्सिअस नोंदविण्यात आले.
कुलदीप श्रीवास्तव म्हणाले की, गेल्या तीन ते चार दिवसांपासून हवेचा वेग कमी आणि स्वच्छ सूर्यप्रकाशामुळे उच्च तापमान नोंदविण्यात आले. विभागाच्या मते, मैदानी भागात जेव्हा जास्तीत जास्त तापमान 40 डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त असेल आणि सामान्यपेक्षा कमीतकमी 4.5 डिग्री सेल्सियस जास्त असेल तर ते 'लू' म्हणून घोषित केले जाईल. त्याच वेळी तापमान सामान्यपेक्षा 6.5 अंश सेल्सिअसपर्यंत वाढते तेव्हा तीव्र उष्णतेची लाट जाहीर केली जाते.
श्रीवास्तव म्हणाले, आज (मंगळवार) ताशी 35 किलोमीटर वेगाने वारे वाहू लागल्याने कमाल तपमान सुमारे 38 अंश सेल्सिअसपर्यंत कमी होईल. त्याचबरोबर हवामान खात्याने आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुरा या राज्यांसाठी 'ऑरेंज अलर्ट' जारी केला आहे. या ईशान्येकडील राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने अंदाज वर्तविला आहे. हवामान खात्यानेही 2 एप्रिलपर्यंत ईशान्य भारतात जोरदार पावसाचा अंदाज वर्तविला आहे.