नवी दिल्ली : यूपीएनं राष्ट्रपती निवडणुकीसाठी मीरा कुमार यांना उमेदवारी दिली आहे. मीरा कुमार यांना उमेदवारी दिल्यावर आता भाजपकडून त्यांच्यावर निशाणा साधण्यात येत आहे. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी मीरा कुमार यांचा लोकसभेतला एक व्हिडिओ ट्विट केला आहे. लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार यांनी अशाप्रकारे विरोधी पक्षनेत्याला वागणूक दिली, असं सुषमा स्वराज यांनी या ट्विटमध्ये म्हंटलं आहे.
३० एप्रिल २०१३चा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये सुषमा स्वराज यूपीए सरकारच्या कामगिरीवर टीका करत आहेत. या व्हि़डिओमध्ये सुषमा स्वराज यांनी यूपीए सरकारच्या घोटाळ्यांवरही भाष्य केलं आहे. सरकारवर टीका करत असताना तेव्हाच्या लोकसभा अध्यक्षा मीरा कुमार सुषमा स्वराज यांना थांबायला सांगत आहेत. सहा मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये मीरा कुमार यांनी सुषमा स्वराज यांना ६० वेळा थांबायला सांगितल्याचा दावा इंग्रजी वेबसाईट डेली पायोनिअरनं केला आहे.
This is how Lok Sabha Speaker Meira Kumar treated the Leader of Opposition - https://t.co/hxHWHaJ4D9
— Sushma Swaraj (@SushmaSwaraj) June 25, 2017