आज चक्रीवादळात रुपांतर होऊ शकतो 'यास', नेव्ही आणि कोस्ट गार्ड अलर्ट

26 मे रोजी भारतीय हवामान खात्याने 'यास' चक्रीवादळ ओडिशा-पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवरुन धडकण्याची शक्यता वर्तवली केली. 

Updated: May 22, 2021, 08:09 PM IST
आज चक्रीवादळात रुपांतर होऊ शकतो 'यास', नेव्ही आणि कोस्ट गार्ड अलर्ट title=

भुवनेश्वर : 26 मे रोजी भारतीय हवामान खात्याने 'यास' चक्रीवादळ ओडिशा-पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवरुन धडकण्याची शक्यता वर्तवली केली. ओडिशा सरकारनेन14 जिल्ह्यांना सतर्क केले आहे. राज्य सरकारने शुक्रवारी भारतीय नौदल आणि भारतीय तटरक्षक दलाला परिस्थितीशी सामोरे जाण्यासाठी तयार राहण्याचे आवाहन केले आहे.

ओडिशातील मुख्य सचिव एस.सी. महापात्र यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची झालेल्या बैठकीनंतर सांगितले की, ‘यास’ चक्रीवादळाचा राज्यात काही परिणाम झाला तर राज्य सरकार कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यास तयार आहे. ते म्हणाले की, हवामान खात्याने चक्रीवादळाची संभाव्यता, मार्ग, तिचा वेग, किनारपट्टीवर धडकणार असलेलं ठिकाण इत्यादींची माहिती अद्याप दिली नसली तरी सरकारने तयारी सुरू केली आहे.

हवामान अंदाज

हवामान खात्याने गुरुवारी सांगितले की, 22 मे रोजी बंगाल उपसागराच्या पूर्व मध्य भागावर कमी दाबाचे क्षेत्र तयार होईल जे चक्रीवादळ वादळाच्या रूपात बदलू शकेल आणि 26 मे रोजी ओडिशा-पश्चिम बंगालच्या किनाऱ्यावर ते धडकेल. विभागाने मच्छिमारांना त्वरित परत येण्याचा सल्ला दिला असून लोकांना किनाऱ्यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे.