Deep Sleep : शांत झोप लागत नाही? 'ही' 1 मिनिटाची जगप्रसिद्ध युक्ती वापरा, अंथरुणावर पडताक्षणी लागेल झोप

Deep Sleep Remedy : कितीही थकलो असो तरी, अनेक वेळा अंथरुणावर पडल्यानंतरही शांत झोप लागत नाही. काही वेळाने लागली तरी अचानक रात्री जाग येते. असं तुमच्यासोबतही होत असेल तर 'ही' 1 मिनिटाची जगप्रसिद्ध युक्ती वापरा, अंथरुणावर पडताक्षणी झोप लागेल.   

नेहा चौधरी | Updated: Oct 21, 2024, 03:22 PM IST
Deep Sleep : शांत झोप लागत नाही? 'ही' 1 मिनिटाची जगप्रसिद्ध युक्ती वापरा, अंथरुणावर पडताक्षणी लागेल झोप title=
Deep Sleep Use this 1 minute world famous trick fall asleep into bed few seconds

Deep Sleep Remedy : डॉक्टर कायम सांगतात कमी झोप ही अनेक आजारपणाचे मूळ कारण आहे. ते सांगतात माणसाने कमीत कमी 7-8 तास झोप घेणं गरजेच आहे. आजच्या काळात कामाचा ताण आणि टेन्शन यामुळे अनेकांना निद्रानाशचा त्रास होतो. अगदी थकवा, चिडचिडेपणा आणि एकाग्रतेचा अभाव जाणवतो, त्यामुळे अनेक जण डॉक्टरांच्या सल्लाने झोपेच्या गोळा किंवा उपचार घेतात. हे या गोष्टी कायम स्वरुपी योग्य नाही. गोळ्या आणि उपचार हा कायमचा रामबाण उपाय नाही. तुमची ही समस्या दूर करण्यासाठी ही सोप्या आणि नैसर्गिक पद्धतींच्या मदतीने काही सेकंदात अंथरुणावर पडताक्षणी तुम्हाला झोप लागेल. (Deep Sleep Use  this 1 minute world famous trick fall asleep into bed few seconds)

4-7-8 श्वास घेण्याची पद्धत

हे विशेष श्वास तंत्र शरीर आणि मन दोन्ही शांत करण्यासाठी उपयुक्त आहे. यामध्ये तुम्हाला 4 सेकंद नाकातून श्वास घ्यायचा आहे. त्यानंतर 7 सेकंद श्वास रोखून ठेवावा आणि 8 सेकंद तोंडातून श्वास सोडा. असे 2-3 वेळा केल्याने तुम्हाला आराम आणि झोप येईल. या पद्धतीमुळे मनातील विचार थांबतात आणि शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो, त्यामुळे तुम्हाला शांत झोप लागण्यास मदत मिळते. 

गडद आणि शांत वातावरण तयार करा

तुमच्या बेडरुमचे वातावरण झोपेसाठी योग्य आहे हे खूप महत्त्वाचे असतं. खोली गडद आणि शांत ठेवा. आवश्यक असल्यास, हलके संगीत वाजवा, हे खोलीतील बाह्य आवाजापासून आपले लक्ष विचलित करणार नाही. गडद आणि शांत वातावरण शरीर आणि मन आराम करण्यास मदत देतं. 

 
मॅग्नेशियम समृद्ध नाश्ता खा

मॅग्नेशियम हे एक नैसर्गिक खनिज आहे जे झोपेसाठी आवश्यक आहे. झोपण्यापूर्वी थोडा वेळ मॅग्नेशियम युक्त नाश्ता खाल्ल्याने शरीराला आराम मिळतो. बदाम, ओट्स किंवा मॅग्नेशियम सप्लिमेंट्स झोपेसाठी चांगले असतात. यामुळे शरीरातील तणाव कमी होतो आणि झोप लवकर येण्यास मदत होते.

ध्यान करा किंवा स्नायू आराम करा

ध्यान केल्याने मनातील विचार शांत होतात. आपल्या शरीराच्या प्रत्येक स्नायूला एक एक करून आराम करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून संपूर्ण शरीर विश्रांतीच्या स्थितीत येईल. याला प्रोग्रेसिव्ह मसल रिलेक्सेशन (पीएमआर) म्हणतात. असे केल्याने शरीरातील तणाव कमी होतो आणि झोप चांगली लागते.

उबदार दूध प्या

झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट दूध किंवा उकळलेला हर्बल टी (कॅमोमाइल चहा) प्यायल्याने शरीराचे तापमान वाढते आणि तुमचे शरीर झोपेसाठी तयार होते. हर्बल चहामध्ये असलेले घटक मन शांत करण्यास आणि शरीराला आराम देण्यास मदत करतात. यामुळे शरीराला लवकर विश्रांती मिळते आणि झोप येते.

हे उपाय सोपे आणि नैसर्गिक आहेत, जे तुम्हाला 5 मिनिटांत शांत झोप घेण्यास मदत करतील. जर तुम्हाला दिवसभर ताजेतवाने राहायचे असेल तर रात्री चांगली झोप घेणे महत्वाचे आहे आणि या उपायांमुळे तुम्हाला या समस्येपासून मुक्ती मिळण्यास नक्कीच मदत होईल.

(Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)