अख्या जगाला वेध लागलेय ते 2025 या नवीन वर्षांचे. जगभरात 2024 ला निरोप देऊ 2025 च्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात येत आहे. येणारं नवीन वर्ष कसं असेल याबद्दल ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ, अकंशास्त्र तज्ज्ञ प्रत्येक जण भाकीत करत आहेत. बाबा वेंगा या प्रसिद्ध महिलेनेही 2025 बद्दल भाकीत केलंय. त्यात 'लिव्हिंग नॉस्ट्रॅडॅमस ' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ब्राझीलच्या एथोस सलोमेने नवीन वर्षाबद्दल भविष्यवाणी केलीय. 34 वर्षीय एथोस सलोमची तुलना 16 व्या शतकातील महान संदेष्टा नॉस्ट्रॅडॅमसशी करण्यात येते. च्या शतकानुशतके जुन्या भविष्यवाण्या त्याच्या मृत्यूनंतरही चर्चेत आहेत. सलोमीनेच म्हटलं होतं की कोविड सारखी महामारी पसरेल, युक्रेनमध्ये भयानक युद्ध सुरू होईल आणि तिने ब्रिटनची राणी एलिझाबेथच्या मृत्यूची भविष्यवाणी देखील केली होती. आता त्याने 2025 साठीच्या त्याच्या भविष्यवाण्यांची संपूर्ण यादी प्रसिद्ध केली आहे, ज्यात सात भयानक भविष्यवाण्यांचा समावेश आहे ज्यात डिजिटल सर्वनाश म्हणजे AI द्वारे टेकओव्हर, सुधारित मानव आणि अलौकिक प्राण्यांचे अस्तित्व यासारख्या गोष्टींची त्याने पूर्वकल्पना दिली होती.तर त्याचा भाकीतानुसार येणारं नवीन वर्ष 2025 हे मोठे बदल घडवणारं आणि धोकादायक आहे. त्याने 2025 साठी 7 भयानक भाकीत केलीय. चला मग जाणून घेऊयात काय आहेत ही भाकीत
अलाइव्ह नॉस्ट्रॅडॅमसचा असा विश्वास आहे की, मानवता एका नवीन दिशेने वाटचाल करेल, जिथे अनुवांशिकरित्या सुधारित मानव तयार केले जातील. या बदलामुळे आशियातील जैवतंत्रज्ञानात जलद प्रगती होईल, ज्यामुळे मानवतेसाठी नैतिक आणि सामाजिक प्रश्न निर्माण होऊ शकतात.
सलोमच्या मते, 2025 मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स शिखरावर असेल आणि पूर्ण स्वायत्तता प्राप्त करेल. मानवाच्या नियंत्रणाखाली असलेल्या अशा क्षेत्रातही AI निर्णय घेण्यास सक्षम असेल. अशा परिस्थितीत मानव एआय नियंत्रित करू शकणार का हा मोठा प्रश्न आहे.
2025 मध्ये एलियन्सच्या अस्तित्वाबद्दल अधिकृत घोषणा केल्या जातील असा सलोमेचा दावा आहे. यावरून पृथ्वीवरील परकीय जीवनाची चिन्हे, मंगळावरील सूक्ष्मजीवांचे पुरावे किंवा इतर संस्कृतींचे अस्तित्व दिसून येऊ शकते.
2025 पर्यंत जागतिक ऊर्जा संकट उद्भवू शकतं, ज्याचा उपयोग मोठे देश आपली शक्ती वाढवण्यासाठी करतील, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला आहे. या ऊर्जा संकटाचा सर्वाधिक परिणाम विकसनशील देशांवर होणार आहे.
सलोम सांगतात की, भविष्यात आरोग्य आणि सुरक्षितता सुधारण्याच्या नावाखाली माणसांच्या त्वचेत चिप्स लावण्यात येतील. लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि मतभेद दडपण्यासाठी सरकार त्याचा वापर करू शकतात. त्यांच्या मते, कोविडसारख्या महामारीनंतर या तंत्रज्ञानाने लोकांची मानसिकता तयार केली आहे.
सालोमने इशारा दिला की हवामान बदलाचा वापर शस्त्र म्हणून केला जाऊ शकतो. उदाहरणार्थ, भूगर्भीय अभियांत्रिकीचा वापर दुष्काळ आणि अवकाळी वादळ निर्माण करण्यासाठी केला जाईल.
ते म्हणाले की 2025 मध्ये गुप्त लष्करी तळ आणि लष्करी तंत्रज्ञान उघड होईल, ज्यामुळे निषेधाच्या लाटा वाढू शकतात.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)