गर्भाशय प्रत्यारोपणासाठी 'गॅलक्सी'मध्ये महिलांच्या रांगा

गर्भाशय प्रत्यारोपणाची देशातील पहिली शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर पुण्यातल्या 'गॅलेक्सी हॉस्पिटल'कडे आता या शस्त्रक्रियेसाठी महिलांची रांग लागलीय. १० दिवसांत तब्बल ४२ जणींनी गर्भाशय प्रत्यारोपणासाठी नोंदणी केलीय. 

Updated: May 30, 2017, 03:22 PM IST
गर्भाशय प्रत्यारोपणासाठी 'गॅलक्सी'मध्ये महिलांच्या रांगा title=

अश्विनी पवार, झी मीडिया, पुणे : गर्भाशय प्रत्यारोपणाची देशातील पहिली शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर पुण्यातल्या 'गॅलेक्सी हॉस्पिटल'कडे आता या शस्त्रक्रियेसाठी महिलांची रांग लागलीय. १० दिवसांत तब्बल ४२ जणींनी गर्भाशय प्रत्यारोपणासाठी नोंदणी केलीय. 

गर्भाशय प्रत्यारोपणाची देशातील पहिली शस्त्रक्रिया पुण्यात पार पडली. पुण्यातील गॅलेक्सी हाँस्पिटलमध्ये सलग दोन दिवसांमध्ये दोन महिलांवर गर्भाशय प्रत्यारोपणाच्या  शस्त्रक्रिया करण्यात आल्या. वैद्यकीय क्षेत्रात भारताच्या शिरपेचात हा मानाचा तुरा खोवला गेला.  त्यानंतर आता या हॉस्पिटलकडे अशा प्रकारची शस्त्रक्रिया कऱण्यासाठी अक्षरशः रिघ लागलीय. गेल्या १० दिवसात देशभरातून ४२ महिलांनी इथे नोंदणी केलीय.

केवळ विवाहित महिलांवरच ही शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. याशिवाय ज्यांना गर्भाशयच नाही किंवा ज्यांच्या गर्भाशयाला इजा झालीय, अशाच महिलांवर ही शस्त्रक्रिया होणार आहे, अशी माहिती 

दरम्यान, याआधी शस्त्रक्रिया झालेल्या दोन्ही महिलांची तब्येत चांगली आहे. त्यांना लवकरच डिस्चार्ज मिळेल. आई होणं ही जशी प्रत्येक स्त्रीला मिळालेली एक देणगी आहे तसाच तो तिचा अधिकारदेखील आहे. मात्र बऱ्याचदा गर्भाशयाच्या विकारामुळे महिलांना आई होण्यापासून वंचित रहावं लागतं, अशा महिलांना गर्भाशय प्रत्यारोपण म्हणजे एक नवसंजीवनी आहे.