चंद्रशेखर भुयार, झी मीडिया, बदलापूर : वडापावच्या स्टॉलवर एक भयानक अपघात घडला आहे. वडापावच्या स्टॉलला(Vadapav stall) रिक्षाने धडक दिल्याने हा अपघात घडला. वडे तळत असलेल्या महिला विक्रेत्याच्या अंगावर उकळते तेल उडाले. यात ही महिला गंभीर जखमी झाली आहे(Horrible Accident). बदलापुरमध्ये(badalapur) ही घटना घडली आहे.
बदलापूर शहरातील एमआयडीसी रस्त्यावरील वेंकीज हॉटेलच्या समोर हा अपघात घडला. सिमिता कांबळे आणि त्यांच्या आई मंगला पोपटतुपे या रस्त्याच्या कडेला वडापावचा स्टॉल लावतात. रविवारी संध्याकाळी सात वाजताच्या सुमारास अंबरनाथच्या दिशेने भरधाव निघालेल्या रिक्षाने वडापावच्या स्टॉलला जोरदार धडक दिली.
ही धडक एवढी जोरदार होती की रिक्षासह वडापावचा स्टॉलही उलटा झाला. रिक्षाने स्टॉलला धडक दिली तेव्हा वडे तळण्यासाठी कढईत असलेल उकळते तेल हे सिमीता यांच्या हाता पायावर उडाले. त्यामुळे त्यांचे हात पाय गंभीररीत्या भाजले आहेत. सध्या त्यांच्यावर बदलापूरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी रिक्षा चालकाला ताब्यात घेतला आहे. हा रिक्षा चालक कोण आहे? अपघात नेमका कशामुळे झाला. याबाबत पोलिस अधिक चौकशी करत आहेत.
ठाणे, कल्याण-डोंबिवली सह बदलापूरमधील रिक्षा चालक बेदकारपणे रिक्षा चालवत असल्याचा आरोप नेहमीच प्रवाशांकडून केला जातो. रिक्षा चालकांमुळे अनेक अपघात घडतात. मागे अंबरनाथमध्ये रिक्षा चाचलाकेन रिक्षा थेट फ्लॅटफॉर्मवर नेल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यातच आता ही अपघाताची घटना घडली आहे. या अपघातमुळे वडापाव स्टॉल चालवणाऱ्या महिलांचे मोठे नुकसान झाले आहे.