Acharya Tushar Bhosale On Ajit Pawar: विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनमध्ये (Nagpur Winter Session) सत्ताधारी पक्षांना थेट शिंगावर घेतलं. राज्याला एका खमक्या विरोधी पक्षनेत्याची उणिव भासत होती. ही उणिव आता अजित पवारांनी पुर्ण केल्याची चर्चा सुरू असतानाच आता पवारांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अधिवेशनादरम्यान सभागृहामध्ये छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून आता राज्यात नवा वाद निर्माण झाला आहे. (ajit pawar should resign over chhatrapati sambhaji maharaj statement says bjp leader tushar bhosle)
स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांच्या (Chhatrapati Sambhaji Maharaj) नावाने बाल शौर्य पुरस्कार (Child Bravery Award) देण्याला तुम्हीही मान्यता दिली होती. आपण जाणीवपुर्वक छत्रपती संभाजी महाराजांना स्वराज्यरक्षक संभाजी महाराज म्हणतो. काहीजण धर्मवीर म्हणतात. राजे धर्मवीर नव्हते, असं अजित पवारांनी (Ajit Pawar On Dharmaveer) अधिवेशनात ठणकावून सांगितलं. त्यानंतर आता अजितदादांच्या या वक्तव्यावरून वाद पेटल्याचं पहायला मिळतंय.
अजित पवारांनी धर्मवीर संभाजी महाराज यांचा अपमान केला असून त्यांना विरोधी पक्षनेतेपदावर (Leader of the Opposition) राहण्याचा नैतिक अधिकार नाही, त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले (Acharya Tushar Bhosale) यांनी केली आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे हिंदू समाजाचा (Hindu) स्वाभिमान आहेत, ते हिंदू समाजाची अस्मिता आहेत, असं वक्तव्य तुषार भोसले यांनी केलंय.
संभाजीराजे धर्मवीर नव्हते, असं म्हणण्याचा अधिकार तुम्हाला दिला कुणी? तुमच्या घरातले विचार आमच्या महापुरुषांवर थोपवण्याचा तुम्हाला अधिकार नाही, असं म्हणत तुषार भोसले यांनी थेट अजित पवारांवर हल्लाबोल केलाय. त्यावेळी त्यांनी ठाकरे गटावर (Thackraey) देखील आगपखड केली.
आणखी वाचा - चित्रा वाघ यांना उर्फी जावेद ने दिलं सणसणीत उत्तर, फडणवीसांना टॅग करत म्हणाली...
दरम्यान, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे आपली भूमिका बदलणार नसतील तर ते अजित पवार यांचा निषेध करणार का?, असा सवाल त्यांनी यावेळी विचारला आहे. तर, संजय राऊत (Sanjay Raut) यांची दातखीळ बसली आहे का?, असा खोचक प्रश्न तुषार भोसले यांनी नाशिकमध्ये (Nashik News) बोलताना विचारलाय. त्यामुळे आता धर्मवीरमुळे हा वाद आणखी पेटणार असल्याचं चित्र आहे.