Holi Viral Video : सोशल मीडियामुळं (Social Media) कलाकार म्हणू नका किंवा मग नेतेमंडळी, सर्वांनाच व्यक्त होण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध झालं आहे. अनेकदा काही खासगी कारणांसाठी, अनेकदा सामाजिक कारणांसाठी काही पोस्ट लिहित, फोटो किंवा व्हिडीओ शेअर करत या माध्यमाचा वापर केला जातो. आजची तरुणाई या सोशल मीडियाच्या जरा जास्तच जवळची. हो... पण यात नेतेमंडळीही मागे नाहीत बरं. कारण, याच माध्यमामुळं राजकारणातील चेहरे त्यांच्या एका वेगळ्या रुपामुळं सातत्यानं चर्चेत असतात. (Amravati MP Navneet rana goes for a bike ride with husband ravi rana in melghat watch video )
प्रकाशझोतात असणाऱ्या या नावांपैकी एक म्हणजे अमरावती लोकसभा क्षेत्रातील खासदार नवनीत राणा (Navneet Rana). नवनीत राणा हे नाव राजकीय वर्तुळात नवं नाही किंबहुना त्यांच्या नावाभोवती असणारी चर्चेची आणि वादाची वलयंही कमी नाहीत. अशा राणा या कायमच त्यांच्या वेगळेपणानं नेटकऱ्यांच्या नजरा वळवतात. आदिवासी समुदायाच्या वाड्यापाड्यांवर जाऊन त्यांची भेट घेण्यापासून ते अगदी त्यांच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणाऱ्या याच नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी नुकतीच अशाच काही आदिवासी बांधवांची भेट घेतली.
मेळघाटातील या समुदायांची भेट घेण्यासाठी यावेळी राणा दाम्पत्यानं बाईक राईडला पसंती दिली (Navneet Rana Bike Ride). बाईकवरूनच ही दोघं या दौऱ्यावर निघाली आणि पाहता पाहता या क्षणांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. खुद्द राणा यांनी तो शेअरही केला. जिथं त्यांनी होळी साजरा करण्यासाठी आपण मेळघाटातील खेडोपाडी गेल्याचं सांगितलं. अनेकांनी त्यांचं कौतुकही केलं. एका व्हिडीओमध्ये ही जोडी खाद्यपदार्थांचा आस्वास घेत गप्पाही मारताना दिसली.
पूरे 5 दिन मेळघाट क्षेत्र के आदिवासी भाईयो के साथ होली मनाने के लिये 2 व्हीलर पर गांव गांव का भ्रमण करते हुए और समस्या सुनते हुए pic.twitter.com/rl4Htsxnn8
— Navnit Ravi Rana (@navneetravirana) March 5, 2023
मेलघाट क्षेत्र के हर गांव में लोकसंगीत के साथ स्वागत.. साथमे आदिवासी नृत्य करते हुए व विधायकजी आदिवासी ढोल बजाते हुए pic.twitter.com/xeAIGwwDpl
— Navnit Ravi Rana (@navneetravirana) March 5, 2023
होळी निमित्त मेळघाट येथील प्रवास दरम्यान धारणी येथे डोसा खाण्याचा आनंद घेतला pic.twitter.com/jDLEHbJXPF
— Navnit Ravi Rana (@navneetravirana) March 5, 2023
नवनीत राणा आणि रवी राणा बाईक राईडला निघाले, तिथं त्यांनी आदिवासींसोबत नृत्यही केलं. पण, या साऱ्यामध्ये नेटकऱ्यांना एक बाब खटकली. ही बाब म्हणजे त्या दोघांनीही या प्रवासाच हेल्मेटचा वापर केला नव्हता. नियम फक्त आम्हालाच का...?, हेल्मेट कुठंय? हे असे अनेक प्रश्न नेटकऱ्यांनी विचारण्यास सुरुवात केली. काहींचं लक्ष बाईवर नंबर प्लेटच नाही याकडेही गेलं. बस्स... मग काय? याच मुद्द्यांवर त्यांच्यावर काहीजणांनी टीकेची झोडही उठवली. समाजापुढे आदर्श प्रस्थापित करणाऱ्या नेतेमंडळींचं हे वागणं तुम्हाला पटलं?