Kalyan Crime News: कल्याणमध्ये रिक्षा चालक (Kalyan Auto Driver) आणि त्याच्या तीन मित्रांनी डॉक्टराची लूट केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. रिक्षा चालक व त्याच्या तीन मित्रांनी रिक्षात बसल्यावर डॉक्टराची लूट केली आहे. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या डॉक्टरच्या खात्यातून ७३ हजार व त्याच्याजवळील पैसे आणि सोने लुबाडून नेले. डॉ. जवाहरलाल चिलगर असं या डॉक्टरांचे नाव आहे. (Auto Driver Robbed Doctor)
कल्याण पश्चिमेत खडकपाडा परिसरात राहणारे डॉ. जवाहरलाल यांनी कल्याण स्टेशनच्या बाहेरुन खडकपाड येथे जाण्यासाठी रिक्षा केली. रिक्षेतून प्रवास करणाऱ्या डॉक्टरला रिक्षा चालक व त्याच्या साथीदारांनी ओळख काढली. डॉ. चिलगर यांना गोड बोलून पार्टी करण्याचे आमिष दाखवले. पार्टीच्या नावाने त्याला मद्यधुंद होईपर्यंत दारू पाजली. त्यानंतर त्यांच्याकडे असलेल्या वस्तू चोरल्या. मद्यधुंद असलेल्या डॉक्टरांना तिथेच परिसरात सोडून दिले. फसवणुकीचा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी थेट पोलिस स्टेशन गाठले. या प्रकरणी कल्याण बाजारपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल होताच 24 तासाच्या आत चारही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
कैंसर मलंग शहा, साबिर इमाम शेख, उर्फ दूरी, नमिर नईम शेख, सलीम अकबर शेख, अशी या आरोपींची नावे असून या आरोपींकडून एक १३ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन, दोन मोबाईल, दोन ऑटो रिक्षा व २३,०००/- रु. रोख रक्कम असा असे २,०३,००० - रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला करत पुढील तपास सुरू केला आहे.
यवतमाळमध्येही कोट्यवधी रुपयांचे घबाड सापडले आहे. आर्णी शहराच्या बायपास रोडवर पोलिसांनी एका कारमधून 2 कोटी 70 लाख रुपयांची संशयास्पद रोख जप्त केली आहे. या कारमधील 6 जणांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. ही रक्कम कुठून आली? तसंच या रकमेचा वापर कशासाठी करण्यात येणार होता. याबाबत पोलिस अधिक माहिती घेत आहे. पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले असले तरीदेखील ते या रकमेबाबत सकारात्मक माहिती देत नसल्याने पोलिसांचा संशय बळावला आहे. पोलिसांनी वाहनातून 500 रुपयांच्या 54 हजार नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.