गणेश कवडे, झी मीडिया, मुंबई : मुंबईत कारमधून एकटे प्रवास करताय? किंवा ओला सारख्या कॅबमधून प्रवास करत असाल तर सावधान कारण तुम्हाला लुटण्याची शक्यता आहे. एक धक्कादायक घटना वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर घडली आहे. वसईतून ओलातून येणारे प्रवासी अनिल बोबले यांच्यासोबत अशीच घटना घडली आहे.
नेमकं काय घडलं?
अनिल बोबले यांनी वसईतून कांदिवलीला जाण्यासाठी ओला पकडली. बोरीवली मेट्रो मॉल परिसरात एका अज्ञात व्यक्तीने कार थांबवली. ड्रायव्हरला तुमच्या गाडीची वायर तुटली असल्याचे सांगितले. ड्रायव्हर गाडीतून उतरल्यावर अजून 4 अज्ञातांनी मिळून कारमध्ये बसलेले अनिल बोबले यांनी लुटले आणि फरार झाले.
CCTVमुळे आरोपी पोलिसांच्या ताब्यात -
प्रवासी अनिल बोबले यांचा मोबाईल, पैसे आणि सोन्याचे दागिने लुटले. यासंदर्भात बोरीवली पूर्व येथील कस्तुरबा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी 50 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे तपासत 4 आरोपी गजाआड.
आरोपींकडून चोरीचे सामान जप्त -
पोलिसांनी एक मोबाईल, सोन्याचे दागिने, तसेच चोरी करण्यासाठी वापरण्यात आलेली गाडी जप्त करण्यात आली आहे. या आरोपीने आणखी किती ठिकणी अशाचप्रकारे फसवणूक करुन लूट केल्याचे कस्तुरबा पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक अनिल आव्हड यांच्याकडून तापस सुरु.