पालघर : विराज ग्रुप च्या कंपनीमध्ये युनियन स्थापन ए वरून झालेल्या गदारोळ मध्ये कंपनीमधील काही कर्मचारी अधिकारी यांना कर्मचाऱ्यांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली. या घटनेमध्ये पोलीस मध्यस्थी करण्यासाठी गेले असता काही पोलिसांनाही मारहाण झाली.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार युनियन स्थापनेवरून दोन गटांमध्ये वाद झाला. त्या वादाचं रुपांतर हाणामारीपर्यंत गेलं. दोन गटांमध्ये झालेल्या वादात दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.
यामध्ये मुंबई लेबर युनियनच्या बाजूने 60 टक्क्याहून अधिक कामगार उभे राहिले. त्यांनी लेबर युनियनच्या नावाखाली नोंदणीही केलेली आहे. मात्र कंपनी व्यवस्थापन लेबर युनियनला थारा देत नसून इतर युनियनला सहकार्य करून मुंबई लेबर युनियनला कंपनीमध्ये शिरू देत नाही यावरूनच गेल्या दोन चार महिन्यांपासून कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली होती.
आता ही नाराजी दगडफेक आणि मारहाणीत रूपांतर झाले.या मध्ये काही पोलिसही जखमी झाले आहेत.पालघरच्या बोईसर एम आय डी सी मधील विराज ग्रुप कंपनीतलं वातावरण तणावपूर्ण आहे.
युनियन स्थापनेवरून झालेल्या गदारोळात, कंपनीतले काही कर्मचारी-अधिका-यांना मारहाण झाली. या ठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. कंपनी व्यवस्थापन मान्यताप्राप्त युनियनवर अन्याय करत असल्याचा आरोप आहे.