बॉलीवुडचा सर्वात श्रीमंत स्टार किड! सलमान खान, Jr NTR यांच्या पेक्षा जास्त संपत्तीचा मालक; आकडा पाहून डोळे गरगरतील

 बॉलीवुडचा सर्वात श्रीमंत स्टार किड कोण जाणून घेऊया. याच्या संपत्तीचा आकडा पाहून डोळे गरगरतील 

वनिता कांबळे | Updated: Oct 21, 2024, 11:26 PM IST
 बॉलीवुडचा सर्वात श्रीमंत स्टार किड! सलमान खान, Jr NTR यांच्या पेक्षा जास्त संपत्तीचा मालक; आकडा पाहून डोळे गरगरतील   title=

Richest Star Kid In Bollywood : बॉलीवूड स्टार्ससोबत त्यांची मुल देखील नेहमीच चर्चेत असतात. स्टार किडच्या प्रत्येक अपडेटवर त्यांच्या चाहत्यांचे लक्ष असते. काही स्टार किड्स आपल्या आई-वडिलांप्रमाणेच फिल्मी दुनियेत खूप नाव कमावतात.  तर अनेक जण वर्षानुवर्षे काम करूनही प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करू शकत नाहीत. काही स्टार किड फ्लॉप ठरतात. मात्र, हेच स्टार किड नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतात. या पैकीच एक नाव आहे ते हृतिक रोशन याचे. हृतिक रोशन हा  बॉलीवुडचा सर्वात श्रीमंत स्टार किड ठरला आहे. सलमान खान, Jr NTR यांच्या पेक्षा जास्त संपत्तीचा तो मालक आहे. 

हृतिक रोशन

बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत स्टार किड्सच्या यादीत हृतिक रोशन अव्वल स्थानी आहे . कमाईच्या बाबतीत हृतिक रोशनने सगळ्यांना मागे टाकले आहे. हृतिक रोशन हा अभिनेता आणि दिग्दर्शक-निर्माता राकेश रोशन यांचा मुलगा आहे.  'कहो ना प्यार है' या चित्रपटातून  हृतिकने बॉलीवुडमध्ये एन्ट्री केली. हृतिकचे वडील राकेश कोशन हेच  त्याच्या पहिल्या चित्रपटचे निर्माता-दिग्दर्शकही होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हृतिक 3,100 कोटी रुपयांच्या मालमत्तेचा मालक आहे.
 HRX ब्रँडमधून हृतिक सर्वात जास्त कमाई करतो.

सैफ अली खान

बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत स्टार किड्सच्या यादीत सैफ अली खान दुसऱ्या स्थानी आहे. सैफ हा यशस्वी अभिनेता आहे. दमदार अभिनयासाठी तो ओळखला जातो. 90 च्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीतील सैफने अनेक सुपरहिट चित्रपट दिले. ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर यांचा मुलगा सैफ  1,200 कोटींच्या संपत्तीचा  मालक आहे.

करीना कपूर आणि आलिया भट्ट या दोघी बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय स्टार किड्स आहेत. सर्वात श्रीमंत स्टार किड्सच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर लोकप्रिय दिग्दर्शक महेश भट्ट आणि अभिनेत्री सोनी राजदान यांची मुलगी आलिया आहे. आलिया 550 कोटींच्या संपत्तीची मालक आहे. अभिनेता रणधीर कपूर आणि प्रसिद्ध अभिनेत्री बबिता यांची मुलगी करीना जवळपास 500 कोटी रुपयांच्या मालमत्तेची मालक आहे. या यादीत पाचवे नाव रणबीर कपूरचे आहे. रणबीर कपूर 350 कोटींच्या संपत्तीचा मालक आहे.