नाशिक : उत्तर प्रदेशहून देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांची बस गोदावरी काठावर असणाऱ्या गाडगेमहाराज पुलाखाली अडकली होती.
गोदावरीच्या पाणी पातळीत अचानक वाढ झाल्याने चालकाला बाहेर पडण्याचा मार्ग सापडला नाही. सिंहस्थ कुंभमेळा काळात शाही मिरवणुकीसाठी शाही मार्ग बनविण्यात आलाय.
आखाड्यांच्या ध्वज पुलाखालून नेता यावा यासाठी पुलाखाली ५ ते ७ फुटाच्या खोलीवरून रस्ता बनविण्यात आलाय. कुंभमेळा संपल्याने भराव टाकून पुलाखालाचा शहीमार्ग बुजविण्यात आल्याय. त्याच मार्गावरून चालकाने बस चालविल्याने ती चिखलात फसली होती. क्रेनच्या सहाय्याने बस बाहेर काढण्यात आल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.