मुंबई: दहावीचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. मात्र अकरावी प्रवेशासाठी CET परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात येईल असं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं होतं. त्यानुसार आता विद्यार्थ्यांना CET परीक्षा कधी आहे याबाबत उत्सुकता लागली आहे.
दहावीच्या निकालानंतर आता अकरावीच्या प्रवेश प्रक्रीयेसाठी CET परीक्षा घेण्यात येणार आहेत. यासाठी उद्यापासून विद्यार्थ्यांना अर्ज भरता येणार आहेत. दोन दिवसांत CET परीक्षेचं वेळापत्रक आणि नियमावली जाहीर केली जाणार आहे.. ही परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं होणार आहे.
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं CET परीक्षेसाठी स्वतंत्र पोर्टल तयार केलं आहे. सीईटीसाठी वेगळा अभ्यासक्रम असणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मात्र ही सीईटी न देताही अकरावीचे प्रवेश घेता येणार आहेत.
अकरावी प्रवेशासाठी असलेल्या CET परीक्षेत मराठी विषयाला डावलण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. इंग्रजी, गणित, समाजशास्त्र, विज्ञान विषयांचा परीक्षेत समावेश करण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा अकरावीच्या प्रवेश CET परीक्षा दिलेल्यांना देण्यात येणार आहे.
विद्यापीठांचे नवं सत्र १ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.12 वीचे निकाल 31 जुलैपर्यंत जाहीर होतील अशी अपेक्षा आहे. देशातील महाविद्यालयं आणि विद्यापीठांमधील नवं शैक्षणिक सत्र 1 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. यूजीसीने त्याबाबतची नवी मार्गदर्शक तत्त्वं जाहीर केली आहेत.