भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा मोठा निर्णय...अखेर पुण्याला दादा...

भाजप प्रदेशाध्यक्ष कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी पुणे सोडण्याचा निर्णय घेतलाय. भाजपच्या एका कार्यक्रमात

Updated: Dec 25, 2020, 09:38 PM IST
 भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा मोठा निर्णय...अखेर पुण्याला दादा... title=

पुणे : भाजप प्रदेशाध्यक्ष कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी पुणे सोडण्याचा निर्णय घेतलाय. भाजपच्या एका कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केलीय. पुण्यात प्रत्येकालाच सेटल व्हावंसं वाटतं. मात्र आपण कोल्हापूरला परत जाणार आहोत, असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे चंद्रकांत पाटील पुढील निवडणूक कोल्हापूरमधून लढवणार का याबाबत उत्सुकता निर्माण झालीय.

चंद्रकांत पाटील यांनी यापूर्वीची विधानसभा निवडणूक ही पुण्याच्या कोथरुड मतदारसंघातून लढवली होती. भाजपाच्या आमदार मेधा कुलकर्णी यांच्या मतदारसंघात चंद्रकांत पाटील यांना भाजपाकडून संधी देण्यात आली होती. तेव्हा मेधा कुलकर्णी यांनी पक्ष नेतृत्त्वाकडे नाराजी व्यक्त केली होती, तसेच मीडियासमोर देखील त्यांना त्यांची नाराजी लपवता आली नव्हती. 

चंद्रकांत पाटील हे कोल्हापूरचे असल्यामुळे त्यांनी विधानसभा निवडणूक कोल्हापुरातून लढवणे अपेक्षित होते. यांनंतरही पुण्यातून चंद्रकांत पाटील निवडून येतील की नाही असं प्रश्नचिन्ह विरोधकांनी लावलं होतं, पण अखेर चंद्रकांत पाटील हे पुण्याच्या कोथरुड विधानसभा मतदारसंघातून भाजपाचा तिकिटावर निवडून आले होते.