CM Eknath Shinde : गेल्या साडेतीन महिन्यांपासून राज्याच्या राजकारणाने वेगळं वळण घेतलं. शिवसेनेतील (Shiv Sena) सर्वात मोठं बंड आणि त्यानंतर राज्यात झालेला सत्तापालट... त्यामुळे राज्याच्या राजकारणात कोणता खेळ चाललाय, असा प्रश्न अनेकांना पडला असेल. जनतेलाच काय तर राजकारण्यांच्या मनात देखील हाच प्रश्न असेल. मात्र, सध्या राजकीय वातावरण शांत झाल्याचं चित्र आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुट्टी घेतली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी राजकीय धावपळीतून छोटा ब्रेक घेतलाय. ते सध्या सातारा जिल्ह्यातील दरे या त्यांच्या मूळ गावी आले आहेत. कालपासून ते कुटुंबीयांसोबत साताऱ्यात (Satara) मुकामी आहेत. त्यामुळे सध्या साताऱ्यात उत्साहाचं वातावरण पहायला मिळतंय.
काल ग्रामदेवतेचे दर्शन घेतल्यानंतर आज त्यांनी काही वेळ शेतीच्या कामात घालवला. शेतात पिकाची पाहणी केली तसेच स्वतः कोळप हातात घेऊन शेतीची कामे देखील केली या आधी सुद्धा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ते गावामध्ये येऊन शेतीच्या कामांमध्ये रमताना अनेकवेळा पाहण्यात आलं आहे.
आणखी वाचा - धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २०० कोटींची पीक विमा भरपाई
मुख्यमंत्र्यांच्या शेतामध्ये लवंग, वेलची, दालचिनी, कॉफी, पेरू, आंबा, फणस, चिक्कू, सफरचंद, स्ट्रॉबेरी, मिरची, हळद तसेच लालचंदन, बाहेरच्या राज्यात पिकणारे गवती चहा अशा विविध प्रकारच्या झाडांमधून त्यांनी आपली संपूर्ण शेती फुलवली. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मुख्यमंत्री आपल्या गावाला नेहमी भेट देताना पहायला मिळतात.
दरम्यान, सर्व बिझी शेड्यूलमधून वेळ काढत शिंदे यांनी शेतीची मशागत करण्यासाठी वेळ काढला. तिथं त्यांनी आपल्या गुरांना चारा घातला. त्याचबरोबर पिकांना पाणी दिलं आणि शेतीची पाहणी देखील केली. एकनाथ शिंदे यांचं नवं रुप पाहून राजकीय वर्तुळात चर्चाला उधाण आलंय.