नागपूर : राज्य सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत सरसकट कर्जमाफीची शनिवारी घोषणा केल्यावर आज नागपुरात पोहचलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे भव्य स्वागत करण्यात आले...
नागपूरच्या डॉ बाबासाहेब अंतराष्ट्रीय विमानतळावर नागपूर शहर भाजपच्या वतीने ढोल ताशाच्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे स्वागत करण्यात आले.
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह जिल्ह्यातील सर्वच आमदार व मोठ्या संखेने भाजप कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. राज्यातील शेतकऱ्यांना देण्यात आलेली कर्जमाफी ही आतापर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
तसेच याद्या बनवण्याचे काम सुरु असून लवकरच कर्जमाफीची प्रक्रिया सुरु करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री यावेळी बोलले तर राज्य सरकारच्या कर्जमाफीच्या निर्णय हा ऐतिहासिक निर्णय असून शेतकरी आत्महत्या थांबण्यास मदत होईल आणि बळीराज सुखावेल अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.