मुंबई: देशात कोरोनाचा कहर सुरू आहे. राजकीय विश्वातून सर्वात मोठी बातमी येत आहे. काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांचं निधन झालं आहे. राजीव सातव यांना कोरोनाची लागत झाली होती. त्यानंतर त्यांची प्रकृती खालावली होती. आज त्यांचं उपचारादरम्यान निधन झालं आहे. 23 दिवसांपासून व्हेंटिलेटरवर असणाऱ्या काँग्रेस खासदार राजीव सातव यांची जगण्याशी झुंज अपयशी ठरली आहे.
काँग्रेसचे नेते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी ट्वीट करून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांच्या जाण्याने काँग्रेसमध्ये एक मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त केली आहे. आपला एक चांगला मित्र आणि राजकीय नेता गमावल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
Congress leader Randeep Singh Surjewala expresses grief over the demise of Party's MP Rajeev Satav. pic.twitter.com/R0F2W6PSJM
— ANI (@ANI) May 16, 2021
We are deeply saddened by the demise of Rajya Sabha MP & compatriot, Shri Rajeev Satav.
His unwavering dedication towards the nation & the party carried out with pure simplicity will be greatly missed.
Our condolences to his family, friends & followers. May he rest in peace. pic.twitter.com/7mlRqdoYZ2
— Congress (@INCIndia) May 16, 2021
Heartfelt condolences over the demise of senior Congress leader and MP Rajeev Satav. He was a promising future of Congress party and it is big loss for our party.
Covid has taken this young leader away from us.
Defeating Corona will be the right tribute to the departed soul. pic.twitter.com/bEevT1grqR— VijayVasanth (@iamvijayvasanth) May 16, 2021
राजीव सातव यांना 19 एप्रिलपासून थोडे बरे वाटत नव्हते. कोविडची लक्षणे दिसत होती. त्यामुळे त्यांनी 21 एप्रिल रोजी कोरोना चाचणी केली. 22 एप्रिल रोजी या रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.
काँग्रेस कमिटीचे सदस्य आणि राज्यसभा सदस्य राजीव सातव यांनी गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांनी कोरोनावर यशस्वी मात केली होती. पण त्यांची प्रकृती पुन्हा खालवली असल्याची माहिती देण्यात आली होती.
सातव यांनी कोरोनाची लागण झाल्यानंतर पुण्यात जहांगीर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. प्रकृती खालावल्याने 25 एप्रिल रोजी त्यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आले होते. तर काही दिवस त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवरही ठेवण्यात आले होते.