हेमंत चापुडे, झी मिडिया, पुणे : कर्जमाफी नंतर शेतकऱ्यांनी वीज माफीचा प्रस्ताव उपमुख्यमंत्री अजित पवारांसमोर मांडला. त्यावर उत्तर देताना आता सगळच जर माफ करायला लागलो तर कपडे काढून मला जावे लागेल त्यामुळे आपल्याला झेपेल तेवढेच करायचं असा टोला अजित पवारांनी लगावला. जुन्नर तालुक्यातील शिवप्रेमींच्या मेळाव्यात ते बोलत होते.
राज्यामध्ये महागाई बेरोजगारी गंभीर होत चालला असताना सर्वसामान्यांना जगणं महागात पडला असताना राज्यात एनआरसीच्या समर्थनार्थ आणि विरोधात मोर्चे काढले जातात हे दुर्दैवी आहे. जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष देण्याऐवजी दुसऱ्याच मुद्दे पुढे आणले जातात. यामधून जातीय वाद निर्माण करून तेढ निर्माण होत होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली.
CAA आणि NRC संदर्भात राज्यातील गैरसमज निर्माण करू नये जोपर्यंत राज्यात महा विकास आघाडीचे सरकार आहे तोपर्यंत राज्यातील जनतेच्या केसालाही धक्का लागणार नाही असे आश्वासन अजित पवारांनी दिले.
राज्यात कारण नसतानाही वेगळे मुद्दे पुढे आणून चर्चा घडवली जाते आणि त्यातून तेढ निर्माण केला जात असल्याचा आरोप अजित पवारांनी केला