डोंबिवलीत IPL वर सुरु होता सट्ट्याचा खेळ, तिघांना बेड्या

IPL वर सट्टा लावणारे तिघे जण गजाआड

Updated: Sep 28, 2021, 08:20 PM IST
डोंबिवलीत IPL वर सुरु होता सट्ट्याचा खेळ, तिघांना बेड्या title=

आतिश भोईर, डोंबिवली : डोंबिवलीतील IPL वर सट्टा लावणाऱ्या तिघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. हायप्रोफाईल लोढा कासारियो गोल्ड परिसरात छापा टाकून तिघांना पोलिसांनी अटक केली.

डोंबिवली मानपाडा पोलिसांची केलेल्या कारवाई आयपीएलवर सट्टा लावणारे गजाआड झाले. सोमवारी रात्री राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनराईजर्स हैदराबाद सामन्यावर सट्टा लावताना पोलिसांनी कारवाई केली. रितेश श्रीवास्तव, कुणाल दपोडकर, निखिल चौरसिया अशी आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी या कारवाईदरम्यान आरोपींकडून 17 मोबाईल, 7 लाख 65 हजार रोकड जप्त केली आहे.