पुण्यातील भाजपमध्ये पेटलेल्या अंतर्गत वादाला तुर्तास पूर्ण विराम

पुणे शहरात भाजपमध्ये पेटलेल्या अंतर्गत वादाला तुर्तास पूर्ण विराम मिळालाय. पालकमंत्री गिरीश बापट आणि खासदार संजय काकडे या दोन गटात वाद विकोपाला गेला होता. 

Updated: Dec 27, 2017, 08:45 PM IST
पुण्यातील भाजपमध्ये पेटलेल्या अंतर्गत वादाला तुर्तास पूर्ण विराम  title=

पुणे : पुणे शहरात भाजपमध्ये पेटलेल्या अंतर्गत वादाला तुर्तास पूर्ण विराम मिळालाय. पालकमंत्री गिरीश बापट आणि खासदार संजय काकडे या दोन गटात वाद विकोपाला गेला होता. 

रावसाहेब दानवेंची मध्यस्ती

या दोन नेत्यांच्या वादाच्या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी बापट आणि काकडे यांची एकत्रित बैठक घेतली. दानवे, बापट आणि काकडे यांच्यासह भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले आणि जिल्हाध्यक्ष आमदार बाळा भेगडे हे या बैठकीला उपस्थित होते. 

बापट हेच पुण्याचे नेते

बैठकीत बापट आणि काकडे यांच्यातील वादावर पडदा टाकण्यात यश आल्याचं बोललं जातंय. बापट हेच पुण्याचे नेते आहेत त्यांचं नेतृत्व मान्य असल्याचं बैठकीत काकडे यांनी सांगितलं अशी माहिती भाजपमधील सुत्रांकडून मिळालीय.