मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि माजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी आज विधानसभेत भाजपच्या त्या १२ आमदारांच्या निलंबनावरून प्रश्न उपस्थित केला.
विधानसभा सभागृहाने भाजपच्या त्या १२ आमदारांचे निलंबन केले. तसा प्रस्ताव आणला. तो प्रस्ताव सभागृहात बहुमताने मंजूर झाला. असे असताना ते १२ आमदार आता सभागृहात कसे उपस्थित आहेत.
त्या आमदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव जसा सभागृहात आला. त्याचप्रमाणे त्यांचे निलंबन मागे घेतल्याचा प्रस्ताव सभागृहात आला का? की तसा प्रस्ताव सभागृहात आणण्याची गरज नाही. विधानसभेचा नियम काय सांगतो याची माहिती द्या अशी मागणी नाना पटोले यांनी हरकतीच्या मुद्द्याद्वारे केली