Good News : किल्ले रायगड आणि माथेरान पर्यटकांसाठी खुले

लॉकडाऊनच्या काळात एक चांगली बातमी पर्यटकांसाठी.  

Updated: Jun 26, 2021, 08:41 PM IST
Good News : किल्ले रायगड आणि माथेरान पर्यटकांसाठी खुले title=

अलिबाग : लॉकडाऊनच्या काळात एक चांगली बातमी पर्यटकांसाठी. कोरोनाच्या नियमांचे पालन करुन रायगड जिल्ह्यातील किल्ले रायगड आणि माथेरान पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी तसे आदेश दिले आहे. दरम्यान, हॉटेल कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर टेस्ट बंधनकारक असणार आहे.

किल्ले रायगड आणि माथेरान हे दोन पर्यटकांचे आवडते हॉटस्पॉट पर्यटनासाठी खुले झालेत. रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी याबाबतचे निर्देश जारी केलेत. कोरोनाच्या नियमांचे पालन करत, जिल्हाधिकाऱ्यांनी पर्यटनाला सशर्त परवानगी दिली आहे.

त्यानुसार माथेरान आणि किल्ले रायगड परिसरातील हॉटेल्स आणि लॉजेस 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील. मात्र अंतर्गत खेळ तसंच स्विमिंग पूल वापरास परवानगी असणार नाही. कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर टेस्ट  बंधनकारक असेल. लेवल 5मधील पर्यटकांना 'इ' पास शिवाय प्रवेश असणार नाही. पर्यटकांची आरोग्य विषयक चाचणी केल्यानंतरच त्यांना प्रवेश दिला जाईल.

पर्यटकांना 'इ' पास शिवाय प्रवेश

- किल्ले रायगड आणि माथेरान पर्यटकांसाठी खुले

- जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी काढले निर्देश

- कोरोनाच्या नियमांचे पालन करून पर्यटन सुरू

- हॉटेल , लॉजेस 50 टक्के क्षमतेने सुरू राहणार

- कर्मचा-यांची आर टी पी सी आर टेस्ट  बंधनकारक

- अंतर्गत खेळ , स्विमिंग पुल वापरास परवानगी नाही

- लेवल 5 मधील पर्यटकांना इ पास शिवाय प्रवेश नाही

- पर्यटकांची आरोग्य विषयक चाचणी केल्यानंतरच मिळणार प्रवेश