विशाल करोळे, झी मीडिया, मुंबई : औरंगाबादकरासाठी आता एक चांगली बातमी येत आहे. औरंगाबाद येथून पुढील दोन महिन्यात औरंगाबाद-दिल्ली, पुणे, बंगळुरू, अहमदाबाद या मार्गावर विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे. याबद्दलचेआश्वासन दहा विमान कंपनीने औरंगाबादच्या शिष्टमंडळाला दिले आहे. औरंगाबादेतून विमानसेवा वाढवण्यासाठी दिल्लीत नागरी उड्डाण मंत्रालयांच्या सचिवांसोबत केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि विमान कंपन्यांची बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
या बैठकीत एअर एशिया, एअर इंडिया इंडिगो, स्पाईस जेट, इंडिगो, अशा कंपन्या उपस्थित होत्या. यावेळेस औरंगाबादवरून विमानसेवा सुरू करावी आणि त्याचे काय फायदे असतील ? हे औरंगाबादच्या शिष्टमंडळाने या विमान कंपन्यांना सांगितले. त्यावर बोलताना पुढील दोन महिन्यात औरंगाबादहुन नवीन विमानसेवा सुरू होईल असे आश्वासन या कंपन्यांनी दिले.
दिल्लीतील या बैठकीत या कंपन्या सकारात्मक होत्या आणि लवकरच याबाबत निर्णय जाहीर करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. जर विमानसेवा सुरू झाली तर औरंगाबादच्या कोलमडलेल्या पर्यटन सेवेला निश्चितपणे फायदा होईल. सध्या औरंगाबादच्या आंतरराष्ट्रीय विमानताळहून फक्त एअर इंडिया च एक दिल्लीसाठी विमान उड्डाण करत आहे.