कोल्हापूर : गेल्याकाही दिवसांत राज्यपालांची भाजप नेत्यांकडून सतत भेट घेतली जात आहे. यावर निशाणा साधत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी भाजप नेत्यांना खोचक टोला लगावला आहे. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील सतत राज्यपालांच्या भेटीला जातात. त्यापेक्षा त्यांनी राजभवनातध रुमच घेतलेली बरी असे हसन मुश्री यांनी म्हणले.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपच्या शिष्टमंडळाने मंगळवारी राज्यपालांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी राज्य सरकार कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. आरोग्यव्यवस्थाही पूर्णपणे कोलमडली आहे. रुग्णसंख्या लपवली जात आहे. मृतदेहांबाबत प्रोटोकॉलचं पालन होत नाही. राज्यातील सरकार पूर्णत: अपयशी ठरलं आहे, असे या शिष्टमंडळाने राज्यपालांना सांगितले होते.
कोरोनाच संकट जगभर पसरलं आहे. आपल्या राज्याने लॉक डाऊन सर्वात आधी घोषित केला. मध्यप्रदेशच्या राजकारणामुळे केंद्र सरकारने आठ ते दहा दिवसांनी लॉकडाऊन केल. केंद्रसरकारने वेळीच लॉकडाऊन केलं असत तर १३५ कोटी जनतेला घरात बसावं लागलं नसत, असं देखील हसन मुश्रीफ यावेळी म्हणाले.
जून आणि जुलै महिन्यात राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन आरोग्य यंत्रणेला आणखी सक्षम करा. त्यासाठी कोरोना योद्ध्यांना प्रोत्साहन देण्याचा विचार करावा. जेणेकरून या आव्हानाला तोंड देता येईल. तसेच कोरोनाच्या नादात इतर आजाराच्या रुग्णांची गैरसोय होता कामा नये. त्यासाठी विशेष खबरदारी घ्या, असे राज्यपालांनी अधिकाऱ्यांना सांगितले.
यावेळी राज्यपालांनी कोरोना आव्हानाच्या अनुषंगाने राज्याच्या विविध विभागांच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. मुंबई मनपा आयुक्त इकबाल चहल तसेच अतिरिक्त मुख्य सचिव (आरोग्य) प्रदीप व्यास यांनी मुंबईतील कंटेन्मेंट झोनसाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांचे राज्यपालांसमोर सादरीकरण केले.