मुंबई: पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची आज न्यायालयीन कोठडी संपतेय. त्यामुळे शिवसैनिक आणि राऊत समर्थकांचं लक्ष न्यायालयाच्या सुनावणीकडे लागल आहे. सध्या ऑर्थर रोडच्या मध्यवर्ती कारागृहात संजय राऊतांचा मुक्काम आहे.
गोरेगाव येथील पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांना ईडीने अटक केली होती. त्यांची 8 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली होती. आज कोठडी संपत असल्यानं राऊत यांना कोर्टात करणार हजर करण्यात आले. यावेळी ईडीने संजय राऊत यांची कोठडी मागितली नाही. त्यामुळे कोर्टाने राऊत यांना 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तसंच न्यायालयाच्या निर्देशानुसार राऊतांना घरचं जेवण दिलं जाते. राऊत यांच्यावर शस्त्रक्रिया झाली असल्याने परवानगी द्यावी ही विनंती वकिलांनी केली असून आर्थर रोड कारागृह अधीक्षकांना सूचना द्यावी, अशी विनंती करण्यात आली. न्यायालयाने संजय राऊत यांच्या वकिलांच्या मागण्या मान्य केल्या आहे. संजय राऊत यांच्या मेडिकल हिस्ट्रीचे कागदपत्रे CMO चीफ मेडिकल ऑफिसर यांना सादर करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहे. त्यामुळे त्यांना जामीन मिळणार की कोठडी याचा आज 22 ऑगस्ट फैसला होणार आहे.