पंढरपूर : कधी उडणारा मासा तुम्ही पाहिला आहे? हा मासा दीड फूट हवेत उडतो. म्हणून याला फ्लाईग फिश असेही म्हणतात. तर हा मासा दुरुन पाहिल्यावर हेलिकॅप्टर प्रमाणेही दिसतो त्यामुळे त्याला हेलिकॅप्टर मासा नावेनेही ओळखले जाते. या मास्याचे आणखी एक वैशिष्ट आहे ते म्हणजे, या मास्याला फुफुस आहे, त्यामुळेच तो हवा घेण्यासाठी पाण्याच्या बाहेर येतो आणि हवा फुफुसात साठवून ठेवतो. आणि त्यामुळे या मास्याला आणखी एक नाव पडलं आहे ते म्हणजे लंग फिश (lung fish).
हा मासा कॅट फिश (cat fish) या ग्रुपमध्ये मोडतो. त्याच्या संपूर्ण अंगावर बोरीसोरखे काटे असतात. खरे तर हा मासा अमेरिकेतील आहे. तो फिशटॅंक मध्ये ठेवता येणारा मासा आहे. मात्र फिश टॅंकमध्ये ठेवण्यासाठी आणखी मास्यांची भर पडल्यामुळे, मासे पाळणारांची हौस फिटली, त्यामुळे या मास्याला लोकं खाडीत किंवा नदी सोडून देऊ लागले.
या मास्याची वाढ जलदगतीने होते त्यामुळे आता या मास्यांची पैदास खूप वाढली आहे. त्यामुळे आता शेकडोंच्या संख्येने हा मासा मुंबईच्या खाडीत तसेच, उजनीत सापडू लागल्याने मच्छिमारांच्याही चिंतेत भर पडली आहे. हा मासा मिश्राहारी असल्याने तो शेवाळ्या बरोबर इतर मासे आणि त्यांची अंडी खातो. त्यामुळे मासेमारीवरतीही याचा परिणाम होतो.
आधीच उजनीचे वाढते प्रदूषण, बेकायदेशीर आणि व्यावसायिक मासेमारी यामुळे उजनीतील मासेमारी धोक्यात सापडली आहे. त्यात आता या हेलिकॅप्टर मास्याची भर पडली आहे. त्यामुळे मत्स्य विभागाने वेळीच धोका ओळखून हे मासे नष्ट करण्यासाठी उपाययोजना आखण्यास सुरवात केली आहे. या मास्यांमुळे इतर मास्यांच्या प्रजातीला धोका निर्माण झाला आहे, शिवाय मच्छिमारांच्या जाळ्यांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ लागल्याने मच्छिमारही हैराण झाले आहेत.
यामास्याचे पर कडक आणि धार धार असल्याने तो मच्छिमारांच्या जाळ्यात तो अडकतो. नंतर सहजासहजी जाळ्यातून निघतही नाही. त्याला काढणासाठी जाळी फाडवी लागत आहे. त्यामुळे जाळ्यांचे मोठे नुकसान होत आहे. शिवाय बाजारपेठेत या मास्याला मागणी नसते.
30 ते 40 रुपये किलो पर्यंत हे मासे विकले जातात. शिवाय याला काटे असल्यामुळे ते कोणी खायलाही मागत नाही. त्यामुळे मच्छिमारांचा दुष्काळात तेरावा महिना सुरु झाला आहे.
डोळ्यांना आकर्षक दिसणारा आणि याकडे पाहूण कुतुहल वाटणारा हा उडणारा मासा इतका उपद्रावी असेल, असा तुम्ही कधी विचार देखाल केला नसावा. परंतू याकडे आता गांभीर्याने पाहाणे गरजेच आहे.